Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 14:56 IST2025-04-29T14:50:25+5:302025-04-29T14:56:04+5:30
Leopard in Pune Airport: पुणे विमानतळ परिसरात बिबट्याचे दर्शन झाले. विमानतळाच्या धावपट्टीजवळ बिबट्या बसून होता. बिबट्या दिसल्यानंतर सगळेच भेदरले. त्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती देण्यात आली.

Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
Leopard Pune: पुणे विमानतळ परिसरात सोमवारी दोन वेळा बिबट्या दिसला. विमानतळापासून अवघ्या ८०० मीटर अंतरावर बिबट्याचे दर्शन झाले. एकदा धावपट्टीजवळ तर दुसऱ्यांदा विमाने उभ्या असलेल्या ठिकाणी हा बिबट्या दिसला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली. त्यानंतर वन विभागाला याची माहिती देण्यात आली. दोन वेळ बिबट्या दिसल्याचे व्हिडीओही समोर आले आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलपासून अवघ्या ८०० मीटर इतक्या अंतरापर्यंत आला होता. विमानतळ परिसरात बिबट्या आल्याचे कळल्यानंतर अधिकारी आणि प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला होता.
वाचा >>ते झाल्यास आमच्या प्रेतांवरूनच होईल; पुरंदरच्या विमानतळाला शेतकऱ्यांचा ‘रखरखीत’ विरोध
Leopard sighted at Pune airport runway a while back 😍 pic.twitter.com/99zLpL9WFz
— Sagar (@Pixel_Stripes) April 28, 2025
पुणे विमानतळावर कधी दिसला बिबट्या?
जी माहिती समोर आली आहे, त्यानुसार सोमवारी (२८ एप्रिल) सकाळी ७ वाजता पहिल्यांदा बिबट्याचे दर्शन झाले. त्यानंतर रात्री ८ वाजता पुन्हा बिबट्या विमानतळ परिसरात आढळून आला. विमानतळाच्या एअरसाईडजवळ बिबट्या दिसला. हे क्षेत्र प्रतिबंधित आहे कारण इथे विमानांचे लँडिंग आणि टेक ऑफ होते.
Leopard sighted at Pune airport runway a while back 😍 pic.twitter.com/99zLpL9WFz
— Sagar (@Pixel_Stripes) April 28, 2025
वन विभागाच्या अधिकाऱ्याने काय सांगितले?
वन विभागाचे अधिकारी सुरेश वरक यांनी सोमवारी रात्री उशिरा याबद्दल माहिती दिली. 'सकाळी ७ वाजता आणि रात्री ८ वाजेच्या सुमारास तो दिसला. रात्री तो धावपट्टीपासून ५०० मीटर आणि नवीन टर्मिनल इमारतीपासून ८०० मीटर अंतरावर होता. आम्ही विमानतळ परिसरात त्याचा शोध घेत आहोत. त्याला पकडण्यासाठी कॅमेरा ट्रॅपही बसवण्यात आले आहेत', असे वरक यांनी सागितले होते.
विमानतळ परिसरात बिबट्याचा वावर असल्याची माहिती स्थानिक लोकांच्या व्हॉट्सअप आणि इतर सोशल मीडियावर पसरली. त्यानंतर बिबट्याचे व्हिडीओही व्हायरल झाले. त्यामुळे स्थानिक लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.