शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

पुणे @ ५.९ अंश सेल्सिअस ; बारा वर्षातील किमान तापमानाचा उच्चांक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2018 16:28 IST

गेल्या तीन दिवसांपासून शहरातील किमान तापमानाचा किमान पारा मोठ्या प्रमाणावर घटला असून, शहराला हुडहुडी भरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

पुणे : गेल्या तीन दिवसांपासून शहरातील किमान तापमानाचा किमान पारा मोठ्या प्रमाणावर घटला असून, शहराला हुडहुडी भरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शनिवारी सकाळी किमान तापमानाचा पारा ५.९ अंश सेल्सिअसवर घसरला. गेल्या बारा वर्षांतील किमान तापमानाचा हा उच्चांक ठरला आहे.         उत्तर भारतात शीत लाट पसरली आहे. विदर्भासह मध्यमहाराष्ट्रातही किमान तापमानात गेल्या तीन दिवसांपासून चांगलीच घट नोंदविण्यात येत आहे. शहरात २६ डिसेंबर रोजी किमान तापमानाचा पारा १४ आणि कमाल तापमानाचा पारा ३०.७ अंश सेल्सिअसच्या घरात होता. त्यात सातत्याने घट नोंदविण्यात येत आहे. त्यानंतर २७ डिसेंबरला किमान तापमानात १० अंशापर्यंत आणि कमाल तापमानात २७.७ अंशापर्यंत घट झाली. शुक्रवारी किमान तापमानाचा पारा अणखी ७.४ अंश सेल्सिअस पर्यंत खाली घसरला. कमाल तापमानही २५.४ अंशांच्या घरात होते. 

   शनिवारी (दि. २९) पहाटे शुक्रवारच्या ७.४ अंश सेल्सिअसच्या तुलनेत किमान तापमान दीड अंशाने घसरत ५.९ अंशावर स्थिरावले. तर, कमाल तापमानाचा पारा २६ अंश सेल्सिअसवर राहीला. विशेष म्हणजे २८ डिसेंबर २०१७ रोजी शहरातील किमान तापमान ९.४ अंश सेल्सिअस तापमान होते. त्यावर्षीच्या हंगामातील ते नीचांकी तापमान ठरले होते. गेल्या तीन दिवसांत किमान आणि कमाल तापमानातही घट होत असल्याने रात्री बोचरी थंडी आणि दिवसा कमालीचा गारठा अशी स्थिती सध्या शहरात पाहायला मिळत आहे. या वर्षाचा समारोप अर्था ३१ डिसेंबरला देखील किमान तापमानाचा पारा १० अंश सेल्सिअसच्या खालीच राहील, असा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. रविवारी (दि. ३०) ७ आणि सोमवारी (दि. ३१) किमान तापमान ९ अंश सेल्सिअस राहील, असे हवामान विभागाने सांगितले आहे. त्यामुळे नागरिकांना २०१८च्या निरोपाचा जल्लोष गारठ्यातच करावा लागेल. शहरातील तापमान १ जानेवारीला १० अंशाच्या घरात असेल. त्यानंतरचे तीन दिवस ११ ते १२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान किमान तापमानाचा पारा राहील, असा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. ---------------

गेल्या १२ वर्षांतील किमान तापमानाची स्थिती

७ डिसेंबर २००७        १०.९३१ डिसेंबर २००८        ८.६२५ डिसेंबर २००९        ८.५२० डिसेंबर २०१०        ६.५२७ डिसेंबर २०११        ७.६२७ डिसेंबर २०१२        ७.४१४ डिसेंबर २०१३        ६.८२९ डिसेंबर २०१४        ७.८२६ डिसेंबर २०१५        ६.६११ डिसेंबर २०१६        ८.३२९ डिसेंबर २०१७        ८.७२९ डिसेबंर २०१८        ५.९२७ डिसेंबर १९६८        ३.३    

टॅग्स :weatherहवामानPuneपुणेTemperatureतापमान