Pune Corona News: पुणे शहरात बुधवारी ३४६ कोरोनाबाधितांची नोंद, तर २८७ जणांची कोरोनावर मात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 06:49 PM2021-07-21T18:49:57+5:302021-07-21T18:54:09+5:30

दिवसभरात ७ जणांचा मृत्यू झाला असून २ हजार ८६७ सक्रिय रुग्ण आहेत

In Pune, 346 corona victims were registered on Wednesday, while 287 corona patients were beaten | Pune Corona News: पुणे शहरात बुधवारी ३४६ कोरोनाबाधितांची नोंद, तर २८७ जणांची कोरोनावर मात

Pune Corona News: पुणे शहरात बुधवारी ३४६ कोरोनाबाधितांची नोंद, तर २८७ जणांची कोरोनावर मात

Next
ठळक मुद्देआज खासगी तसेच शासकीय स्वाब तपासणी केंद्रांवर ९ हजार ६९७ नागरिकांची तपासणी शहरातील विविध रुग्णालयात २२७ रुग्ण गंभीर असून ३८७ ऑक्सिजनवर आतापर्यंत ४ लाख ७३ हजार १२६ नागरिक कोरोनामुक्त

पुणे : शहरात बुधवारी दिवसभरात ३४६ कोरोनाबाधित आढळून आले असून, २८७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात ७ जणांचा मृत्यू झाला असून २ हजार ८६७ सक्रिय रुग्ण आहेत.

खासगी तसेच शासकीय स्वाब तपासणी केंद्रांवर ९ हजार ६९७ नागरिकांची तपासणी करण्यात आली. दिवसभरात ७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पुण्याबाहेरील ४ रुग्णांचा समावेश आहे. 

महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रुग्णालयात २२७ रुग्ण गंभीर असून ३८७ ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. शहरातील तब्बल २८ लाख ८  हजार ८८४ जणांची तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ८४ हजार ७०२ नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती. यापैकी ४ लाख ७३ हजार १२६ नागरिक कोरोनामुक्त झाले आहेत. शहरात आजपर्यंत ८ हजार ८६७ जणांचा मृत्यू झाला आहे.

Web Title: In Pune, 346 corona victims were registered on Wednesday, while 287 corona patients were beaten

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app