शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
4
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
5
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
7
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
8
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
9
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
10
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
11
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
13
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
14
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
16
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
17
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
18
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
19
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
20
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

‘पुणेरी पाट्या प्रदर्शनात अवतरले पुणे-३०

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 3:05 AM

‘पुणेरी पाट्या’ म्हणजे पुणेकरांच्या स्पष्टवक्तेपणा आणि थेट भिडताना आशयसंपन्न विचारांचा जणू आरसाच ! पुण्याच्या स्वभावाचे दर्शन घडविणाऱ्या इरसाल, मार्मिक, कधी चिमटा तर कधी टपली मारणा-या ‘पुणेरी पाट्यां’मधल्या खोचक

पुणे : ‘पुणेरी पाट्या’ म्हणजे पुणेकरांच्या स्पष्टवक्तेपणा आणि थेट भिडताना आशयसंपन्न विचारांचा जणू आरसाच ! पुण्याच्या स्वभावाचे दर्शन घडविणाऱ्या इरसाल, मार्मिक, कधी चिमटा तर कधी टपली मारणा-या ‘पुणेरी पाट्यां’मधल्या खोचक शब्दांचे एकेक तीर रसिकमनाचा वेध घेत होते आणि त्या बाणांमधून प्रत्येकाच्या ओठांवर हास्याच्या लकेरी उमटत होत्या.निमित्त होते ‘लोकमत’च्या वतीने पृथ्वी एडिफाईस प्रस्तुत रुद्रा लेझर हिमोथेरपी क्लिनिक आणि खत्री बंधू पॉट आईस्क्रिम व मस्तानी यांच्या सहयोगाने आयोजित करण्यात आलेल्या पुणेरी पाट्या प्रदर्शनाचे. : पगडीखालची खरी बुद्धिमत्ता काय असते, हे पाहण्यासाठी हजारो पुणेकरांनी प्रदर्शनाला भेट दिली. उत्स्फूर्त दाद देत पुणेरी पाट्यांची मजा अनुभवली.‘अरे ही पाटी बघ ना, काय सॉलिड आहे रे’... ‘ही पाटी कुठेतरी वाचली आहे’... ‘खरच पुणेकर म्हणजे ना’... अशा संवादामधून रसिक ‘पुणेरी पाट्यां’चा मनमुराद आनंद घेत होते. अनेक ज्येष्ठांना या पाट्या पाहताना जुन्या आठवणींचा गहिवर येत होता. आजवर सोशल मीडियावर नुसत्याच पुणेरी पाट्या किंवा त्यासंबंधीचे विनोद फिरायचे पण खºया अर्थाने पुणेरी पाट्यांचे पहिले-वहिले प्रदर्शन ‘लोकमत’च्या वतीने आयोजित केल्याबद्दल अनेकांनी दाद दिली. ‘पुणेरी पाट्यां’चा एकत्रितपणे आस्वाद घेत रसिक ‘पुणेरी पाट्यां’च्या विश्वात रमल्याचे चित्र दिसत होते. या पाट्यांमधून ‘अस्सल’ पुणेरीपणाचा अनुभव रसिकांना मिळाला.‘पुणेरी पाट्या’ म्हणजे पुण्याच्या अभिमानाचा मानबिंदू. जे सांगायचे आहे ते स्पष्टपणे पण कुणालाही न दुखावता मांडणे हे ‘पुणेरी पाट्यां’च्या शैलीचे खास वैशिष्ट्य. ‘दाराची बेल वाजविल्यावर दार उघडायला वेळ लागतोच, घरात माणसे राहतात स्पायडरमन नाही’, ‘चार वेळा कंट्रोल एस दाबले तरी सेव्ह एकदाच होते’ अशा नर्मविनोदी पाट्यांमधून पुणेकर रसिक खळखळून हसत होते. या पुणेरी पाट्या आता फारशा पाहायला मिळत नसल्यामुळे त्या संग्रही ठेवण्यासाठी काही पाट्या रसिक कॅमेºयात बंदिस्त करीत होते. कुणी या प्रदर्शनात पाट्यांसमवेत सेल्फी काढताना दिसत होते... ज्येष्ठांसह तरुणाईदेखील पाट्यांच्या विश्वात हरवली होती. ‘पुणेरी पाट्या’ प्रदर्शनाला रसिकांनी पहिल्याच दिवशी उदंड प्रतिसाद दिला. या पाट्या लिहिण्याची एक वेगळी शैली असल्याने पुणेकर रसिकांनाही एका वॉलवर ‘पुणेरी पाटी’ लिहिण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यालाही रसिकांनी उचलून धरले... शब्दांच्या गुंफणीतून ‘पुणेरी पाट्या’ लिहिण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करत होता.प्रदर्शनात रात्रीपर्यंत रसिकांच्या गर्दीचा ओघ सुरूच होता. उद्या (रविवारी) देखील हे प्रदर्शन विनामूल्य सकाळी ११ ते ८ या वेळेत पाहण्यासाठी खुले राहाणार आहे. आवर्जून या!... पुणेकरांचे स्वागत आहे.पुणेरी पाट्यांची स्मरणगाथा‘पुणेरी पाटी’ ही पुण्याची ओळख. पण, आजपर्यंत कधीही एकत्रितपणे प्रदर्शन भरलेले नाही. त्यामुळे ‘लोकमत’चे प्रदर्शन म्हणजे पुणेकरांसाठी स्मरणगाथा ठरली. मोबाईलमध्ये पाट्यांचे फोटो काढले जात होते. अनेक जण पाट्या लिहून घेत होते. हा ठेवा मनात साठवून घेत होते.प्रदर्शनास रसिकांचा प्रचंड प्रतिसाद सकाळपासूनच सुरू होता. दुपारनंतर तर रांगा लागल्या. आपल्या सृहृदांनाही पाट्यांचा आनंद द्यायचा असल्याने अनेक जण तेथून व्हॉट्सअ‍ॅप करत होते.सहकुटुंब मनमुराद हसण्याचा आनंद ‘पुणेरी पाटी’ प्रदर्शनाने दिल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली. अगदी ज्येष्ठांपासून ते तरुणांपर्यंत एकत्रितपणे प्रदर्शनाचा आनंद लुटला जात होता.