Pune Corona News: पुणे शहरात रविवारी २८७ नवे कोरोनाबाधित तर २२८ जणांची कोरोनावर मात
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2021 19:36 IST2021-07-11T19:35:48+5:302021-07-11T19:36:19+5:30
३ हजार ८५ सक्रिय रुग्ण आहेत, दिवसभरात ५ जणांचा मृत्यू

Pune Corona News: पुणे शहरात रविवारी २८७ नवे कोरोनाबाधित तर २२८ जणांची कोरोनावर मात
पुणे: शहरात रविवारी दिवसभरात २८७ कोरोनाबाधित आढळून आले असून, २२८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात ५ जणांचा मृत्यू झाला असून ३ हजार ८५ सक्रिय रुग्ण आहेत. खासगी तसेच शासकीय स्वाब तपासणी केंद्रांवर ६ हजार ७४ नागरिकांची तपासणी करण्यात आली. दिवसभरात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, पुण्याबाहेरील ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २२७ रुग्ण गंभीर असून ४९१ ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. शहरातील तब्बल २७ लाख ३६ हजार २३५ जणांची तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ८१ हजार ८३४ नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती. यापैकी ४ लाख ७० हजार ९७ नागरिक कोरोनामुक्त झाले आहेत. शहरात आजपर्यंत ८ हजार ६५२ जणांचा मृत्यू झाला आहे.