शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
3
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
4
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
5
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
6
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
7
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
8
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
9
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
10
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
11
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
12
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
13
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
14
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
15
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
16
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
17
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
18
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
19
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
20
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?

पुणे - नाशिक महामार्गावर ट्रकच्या धडकेत २५ वर्षीय युवक जागीच ठार, तर एक गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 20:33 IST

ट्रकचालकाचा ताबा सुटल्याने रस्त्यावरील कार ला एका बाजुने धडक दिली. तसेच दुचाकीला पाठीमागच्या बाजुने जोरदार धडक दिली.

राजगुरुनगर : पुणे -नाशिक महामार्गावर चांडोली फाटा येथे ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने २५ वर्षीय युवकाचा जागीच मुत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. 

अक्षय रामदास मुकणे रा. चांडोली तापकीरवस्ती (ता खेड ) असे अपघातामध्ये मूत्यू झालेल्या युवकाचे नांव आहे. हि घटना आज सांयकाळी पाऊने सहाच्या सुमारास घडली.

खेडपोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, पुणे बाजु कडून नाशिक बाजुकडे भरधाव वेगाने जात असताना चांडोली फाटा येथे ट्रकचालकाचा ताबा सुटल्याने रस्त्यावरील कार ला एका बाजुने धडक दिली. तसेच दुचाकीला पाठीमागच्या बाजुने जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकी ट्रकने ५० फुटापर्यंत फरफटत नेली. अक्षय मुकणे यांच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने जागीच मुत्यू झाला. वसंत वाघ रा. चांडोली हा या अपघातात गंभीर जखमी झाला आहे. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन जखमीला तात्काळ रुग्णालयात पाठवून अपघातग्रस्त ट्रकखाली अडकलेली दुचाकी क्रेनच्या सह्याने ट्रक उचलून दुचाकी बाहेर काढली. 

टॅग्स :KhedखेडPoliceपोलिसPuneपुणेAccidentअपघातDeathमृत्यू