Pune Corona News: पुणे शहरात शुक्रवारी २१३ जणांची कोरोनावर मात: तर १७१ नवे रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2021 20:31 IST2021-09-17T20:31:28+5:302021-09-17T20:31:52+5:30
आज विविध तपासणी केंद्रांवर ७ हजार ८३१ संशयितांची तपासणी करण्यात आली

Pune Corona News: पुणे शहरात शुक्रवारी २१३ जणांची कोरोनावर मात: तर १७१ नवे रुग्ण
पुणे : शहरात शुक्रवारी २१५ कोरोनाबाधित आढळून आले असून, १६१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज विविध तपासणी केंद्रांवर ७ हजार ८३१ संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी २.१८ टक्के इतकी आढळून आली आहे.
शहरातील सक्रिय रूग्ण संख्या आजमितीला १ हजार ८६२ सक्रिय रुग्ण आहेत. तर दिवसभरात १० जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ६ जण हे पुण्याबाहेरील आहे. शहरातील आजचा मृत्यूदर हा १.८० टक्के इतका आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रूग्ण संख्या ही १८१ इतकी असून, ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या २८८ इतकी आहे. शहरात आतापर्यंत ३२ लाख ६९ हजार ९६८ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ९९ हजार ५३ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ८८ हजार १९७ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ९९४ जणांचा मृत्यू झाला आहे.