शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
4
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
5
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
6
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
7
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
8
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
9
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
10
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
11
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
12
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
13
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
14
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
15
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
16
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
17
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
18
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
19
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
20
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल

पुण्यात रविवारी तब्बल १९४ जण कोरोनामुक्त होऊन घरी, १०२ कोरोनाबाधितांचीही झालीय वाढ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2020 21:26 IST

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री आठपर्यंत शहरात पाच जणांचा मृत्यू झाला असून, यामध्ये ससूनमध्ये उपचार घेणाºया १३ महिने वयाच्या बालकाचा समावेश आहे़

पुणे : कोरोनाबाधितांची संख्या पुणे शहरात दिवसेंदिवस वाढत असतानाच, दुसरीकडे सुखावह चित्र पाहण्यास मिळत असून, रविवारी तब्बल १९४ कोरोनाबाधित रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत़ मात्र कोरोनाबाधितांची संख्याही आज १०२ ने वाढली असून, यामुळे पुणे शहरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता २ हजार ४८२ इतकी झाली आहे़ यापैकी अ‍ॅक्टिव केसेसची संख्या ही १ हजार ३१८ इतकी आहे़     पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री आठपर्यंत शहरात पाच जणांचा मृत्यू झाला असून, यामध्ये ससूनमध्ये उपचार घेणाºया १३ महिने वयाच्या बालकाचा समावेश आहे़ तर ससूनमध्ये उपचार घेणाºया ८२ वर्षीय व ३७ वर्षीय पुरूषांचा समावेश असून,औंध रूग्णालयातील ७० वर्षीय महिलेचा व नवले हॉस्पिटलमधील ५३ वर्षीय पुरूषाचा समावेश आहे़ पुणे शहरात आजपर्यंत कोरोनाबाधितांची मृत्यूची संख्या १४५ इतकी झाली आहे. गेल्या रविवारपासून पुणे शहरातील रूग्ण वाढीचा आकडा हा शंभरीच्या आसपासच असून, आजही (१० मे) दिवसभरात १०२ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे़ सद्यस्थितीला शहरातील विविध रूग्णालयात उपचार घेत असलेल्या एकूण कोरोनाबाधितांपैकी ९२ रूग्णांची प्रकृती गंभीर असून, यापैकी १७ जण व्हेंटिलेटरवर आहेत़ शहरातील एकूण रूग्णांपैकी ससून रूग्णालयात ११७, नायडू हॉस्पिटल व पालिकेने उभारलेल्या आयसोलेश सेंटरमध्ये ९१० तर खाजगी हॉस्पिटलमध्ये २९१ असे १ हजार ३१८ रूग्ण उपचारासाठी दाखल आहेत.    दरम्यान कोरोना संशयित असलेल्यांच्या तपासणीचे प्रमाणही शहरात वाढविण्यात आले असून, आज ९३८ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते़ यापैकी १०२ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे़ यामध्ये ९ जण ससून रू ग्णालयातील, ८१ जण नायडू व पालिकेच्या अन्य आयसोलेशन सेंटरमधील तसेच खाजगी हॉस्पिटलमधील १२ जणांचा समावेश आहे़

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPuneपुणे