शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
2
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
3
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
4
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
5
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
6
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
9
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
10
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
11
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
12
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
13
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
14
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
15
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
16
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
17
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
18
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
19
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
20
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
Daily Top 2Weekly Top 5

पुणे : ‘पद्मावत’विरोधासाठी तोडफोड, करणी सेनेच्या १५ जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 05:58 IST

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावत या सिनेमाचं प्रदर्शन अवघ्या दिवसावर आलं आहे. गुरुवारी (दि. २५) सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. पण सिनेमाच्या मार्गातील अडचणी काही केल्या दूर होत नाहीत.

पुणे : दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावत या सिनेमाचं प्रदर्शन अवघ्या दिवसावर आलं आहे. गुरुवारी (दि. २५) सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. पण सिनेमाच्या मार्गातील अडचणी काही केल्या दूर होत नाहीत. सिनेमाला विरोध करण्यासाठी २० ते २५ जणांच्या जमावाने पुणे शहरातून जाणाºया सातारा - मुंबई महामार्गावरील वाहनांवर दगडफेक करून तोडफोड केली. या दगडफेकीत किमान १० वाहनांचं नुकसान झालं आहे. ही घटना महामार्गावरील वडगाव पुलालगतच्या सर्व्हिस रोडवर मध्यरात्री १२ च्या सुमारास घडली. याप्रकरणी सिंहगड पोलिसांनी घटनास्थळावरून १५ जणांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना २७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे़पद्मावत सिनेमाला विरोध करण्यासाठी यापूर्वी पुणे शहरात करणी सेनेने मोर्चा काढला होता. सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा दिला होता. २५ जानेवारीला भारत बंदचं आवाहन करण्यात आलं आहे. त्यापूर्वीच पुण्यात वाहनांची तोडफोड करण्याची घटना घडली आहे.याप्रकरणी महेश भापकर (वय ३०, रा़ गांधीनगर, डोंबिवली, जि़ ठाणे) यांनी सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. ते आपल्या चालकासह ट्रक घेऊन कुर्ला येथे जात होते. वडगाव पुलाजवळ ते आले असताना २० ते २५ जणांचा जमाव अचानक गाडीसमोर आला. त्यामुळे गाडी थांबविली असताना लोकांनी दगड मारून काचा फोडल्या व टायरमधील हवा सोडून दिली. तसेच त्यांच्याकडील ३ हजार ९०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले़त्यांच्यामागोमाग येणाºया ८ ते १० वाहनांच्या काचा फोडून टायरमधील हवा सोडून दिली व पद्मावत सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, अशा घोषणा दिल्या. या आंदोलनामुळे महामार्गावर वाहतूककोंडी झाली़ याची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस उपनिरीक्षक घाडगे व तपास पथकातील कर्मचारी घटनास्थळी पोहोचले़ त्यांनी आंदोलन करणाºयांना ताब्यात घेतले़ त्यांच्यावर अन्य कलमांसह दरोड्याचे कलमही लावण्यात आले़अटक केलेल्या १५ जणांना दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले़ सरकारी वकील ज्ञानेश्वर मोरे यांनी सांगितले, की हा गंभीर स्वरुपाचा गुन्हा असून गुन्ह्यात वापरलेले साहित्य जप्त करायचे आहे़ या गुन्ह्यातील अन्य आरोपींना अटक करायची आहे़फिर्यादीकडून जबरदस्तीने काढून घेतलेले ३ हजार ९०० रुपये जप्त करायचे आहेत़ त्यामुळे पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी केली़ न्यायालयाने ती मान्य करून १५ जणांना २७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली़शहरात कडेकोट बंदोबस्तपुणे शहर व पिंपरी-चिंचवडमधील ३६ चित्रपटगृहांमधील ८० स्क्रिन्सवर पद्मावत हा चित्रपट गुरुवारी प्रदर्शित होत असून त्याला होणारा विरोध लक्षात घेऊन पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे़ याबाबत विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त संजय बाविस्कर यांनी सांगितले, की चित्रपटगृहचालकांना अंतर्गत सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यास सांगितले आहे़चित्रपटगृह परिसरातील सीसीटीव्ही लावण्यास सांगण्यात आले आहे़ या चित्रपटगृहाच्या परिसरात ५० पोलीस अधिकारी व २५० हून अधिक कर्मचाºयांची बंदोबस्तावर नेमूणक करण्यात आली आहे़ चित्रपटाविरोधात आंदोलन करण्याची शक्यता असलेल्यांना बोलावून त्यांना कायदा हातात न घेण्याचा इशारा देण्यात आला आहे़बांधकाम व्यावसायिकदेवेन शहा यांच्यावर गोळीबार करून पळून गेलेला प्रमुख आरोपी राहुल शिवतारे याची माहिती सिंहगड पोलिसांना मिळाल्याने तपास पथकातील सर्व अधिकारी व कर्मचारी काल रात्री सिंहगड रोडवर तपासासाठी होते़ शिवतारे याला रात्री पकडले़ त्यानंतर हे सर्व अधिकारी व कर्मचारी पोलीस ठाण्यात असतानाच मध्यरात्री १२ च्या सुमारास वायरलेसवरून या आंदोलनाची माहिती पोलिसांना मिळाली़ तातडीने हे सर्व अधिकारी व कर्मचारी तेथे गेल्याने आंदोलकांचा त्यांनी व्हिडिओ काढून तातडीने ताब्यात घेता आले़ न्यायालयात अटक केलेल्यांनी आम्ही फक्त रास्ता रोको आंदोलन केल्याचे सांगितले़ त्याचवेळी पोलिसांनी तोडफोड करीत असल्याचा व्हिडिओ असल्याचे सांगितले़ त्यानंतर न्यायालयाने त्यांची पोलीस कोठडी मंजूर केली़

टॅग्स :PuneपुणेPadmavatपद्मावतPadmavatiपद्मावती