शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
3
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
4
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
5
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
6
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
7
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
8
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
9
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
11
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
12
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
13
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
14
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
15
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
16
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
17
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
18
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
19
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
20
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांनी दाखवली समयसूचकता अन् नवा मुठा उजवा कालवा फुटण्याचा टळला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 18:41 IST

शेतकरी व नागरिकांचे होणारे लाखो रुपयांचे संभाव्य नुकसान होताहोता राहिले.

ठळक मुद्देजलसंपदा व पोलीस प्रशासनाने युध्दपातळीवर हालचाली

लोणी काळभोर : नागरिकांच्या समयसुचकतेमुळे नवा मुठा उजवा कालवा फुटण्याचा धोका दूर झाल्याने शेतकरी व नागरिकांचे होणारे लाखो रुपयांचे संभाव्य नुकसान टळले आहे. यासाठी जलसंपदा व पोलीस प्रशासनाने युध्दपातळीवर हालचाली केल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.     खडकवासला धरणापासून निघालेला नवीन मुठा उजवा कालव्याच्या माध्यमातून हवेली, दौंड व इंदापूर तालुक्यातील तालुक्यातील सुमारे ६६ हजार हेक्टर शेतीला पाणी पुरवले जाते. गेल्या अनेक वर्षापासून या कालव्याची डागडुजी करण्यात आलेली नाही. त्यामुळे हा कालवा अचानक फुटतो व परिसरातील शेतकरी व नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान होते. सोमवारीही ही तसाच होणारा प्रकार परिसरातील नागरिकांच्या सतर्कतेमुळे टळला.      लोणी काळभोर ग्रामपंचायतींच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे.रुपनर वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर कालव्या खालून जाण्यासाठी एक पूल बांधण्यात आला आहे. या पुलाच्या दोन्ही बाजूंना कालव्याच्या मातीच्या भरावाला आधार देण्यासाठी दगडाचे अस्तरीकरण करण्यात आलेले आहे. या अस्तरीकरणातील काही दगड निखळ कालव्यातील पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती होऊ लागली होती. स्थानिक नागरिकांनी तात्काळ माहिती दिली. माहिती मिळताच जलसंपदा विभाग व लोणी काळभोर पोलीसांनी तात्काळ हालचाली केल्याने होणारे संभाव्य नुकसान टळले.              घटनास्थळाला लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक सुरज बंडगर, उपनिरीक्षक एस ए बोरकर, जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता विजय पाटील, उपविभागीय अभियंता पोपटराव शेलार, भक्ती वाकळे, शिवसेनेचे हवेली तालुका प्रमुख प्रशांत काळभोर, हवेली पंचायत समितीचे उपसभापती युगंधर काळभोर, सरपंच अश्विनी गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब काळभोर यांनी भेट दिली.

गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी थोडी गळती होती. सोमवारी सकाळी जास्त प्रमाणात गळती होऊ लागल्याने धरणातून कालव्यात सोडण्यात येणारे पाणी बंद करण्यात आले. उद्या पाटबंधारे विभागाचे एक पथक या ठिकाणची पाहणी करणार आहे. या पथकाच्या अहवालानुसार तातडीने तेथे दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. येत्या दहा दिवसांत हे काम पूर्ण करण्यात येणार असून त्यानंतरच कालव्यात पाणी सोडण्यात येणार आहे. पोपटराव शेलार,उपविभागीय अधिकारी, खडकवासला पाटबंधारे विभाग) -

टॅग्स :Loni Kalbhorलोणी काळभोरmula muthaमुळा मुठाWaterपाणी