शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

स्वत:साठी खोके, महाराष्ट्राला धोके...' पुण्यात घोषणा देत राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून आंदोलने

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2022 19:58 IST

राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्राचे महत्व कमी करण्यासाठीच भाजपचे हे उद्योग सुरू असल्याची टीका

पुणे : वेदांता व फॉक्सकॉन या दोन कंपन्यांचा दीड लाख कोटी रूपयांचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला नेण्याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेकडून बुधवारी निदर्शने करण्यात आली. शिवसेनेेने पन्नास खोके, महाराष्ट्राला धोके अशा घोषणा दिल्या तर राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्राचे महत्व कमी करण्यासाठीच भाजपचे हे उद्योग सुरू असल्याची टीका केली.

सेमी कंडक्टर तयार करण्याचा हा प्रकल्प महाराष्ट्रात येणार होता. त्याची बोलणीही झाली होती. मात्र संबधित कंपन्यांच्या संचालकांनी हा प्रकल्प गुजरातला सुरू केला. त्याबाबतची त्यांची बोलणीही तिथे झाली. करारावर स्वाक्षऱ्याही झाल्या. त्यानंतर महाराष्ट्रात त्याचे जोरदार पडसाद उमटले असून नव्या सरकारला त्यासाठी जबाबदार धऱत त्यांच्यावर टीका सुरू आहे.

महाराष्ट्राचे महत्व कमी करण्यासाठीच भाजपचा हा उद्योग सुरू असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. पक्षाने केलेल्या आंदोलनात त्या सहभागी झाल्या होत्या. राज्यात हा उद्योग आला असता तर त्यातून रोजगार निर्माण झाला असता. त्यासाठीच महाविकास आघाडी सरकारने तशी चर्चा केली होती. मात्र जाणीवपूर्वक हा प्रकल्प गुजरातमध्ये पळवण्यात आला. यापुढे असे होऊ नये यासाठी खंबीर व गंभीर मुख्यमंत्ऱ्यांची गरज आहे. हवे तर दोन मुख्यमंत्री नेमा, मात्र असे परत होऊ देऊ नका अशी टीका खासदार सुळे यांनी केली. पक्षाचे शहर प्रवक्ते प्रदीप देशमुख, महिला शहराध्यक्ष मृणालिनी वाणी, अश्विनी कदम,दीपक जगताप, विक्रम जाधव, विशाल तांबे, संतोष नांगरे, नाना नलावडे , काका चव्हाण, वैष्णवी सातव, रत्ना नाईक, अश्विनी भागवत ,मनीषा होले, रोहन पायगुडे , फईम शेख आंदोलनात सहभागी झाले होते.

दुसरीकडे शिवसेनेच्या शहर शाखेने याच विषयावरून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. पन्नास खोके, महाराष्ट्राला धोके अशा घोषणा देत त्यांनी राज्यातील नव्या सरकारवर टीका केली. राज्य सरकारमधील नेतृत्व काय ताकदीचे आहे ते यावरून लक्षात येते अशी टीका शहरप्रमुख संजय मोरे यांनी केली. हे सरकार फक्त भांडवलदार घराण्यांसाठी काम करत आहे, त्यांना गरीब सामान्य जनतेचे काहीही पडलेले नाही असे मोरे म्हणाले. गजानन थरकुडे, विशाल धनवडे, कल्पना थोरवे, अविनाश बलकवडे, संजय भोसले आंदोलनात सहभागी झाले होते. जिल्हाधिकाऱ्यांना यावेळी या सर्व प्रकाराची उच्चस्तरीय चौकशीची मागणी करणारे निवेदन देण्यात आले.

टॅग्स :agitationआंदोलनNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाMaharashtraमहाराष्ट्रEknath Shindeएकनाथ शिंदे