शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

कात्रज-कोंढवा रस्त्यावर २५ ते ३० कार्यकर्ते घेऊन आंदोलन; वसंत मोरेंवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 13:03 IST

आम्ही आंदोलने करायची का नाहीत? असं काय आंदोलन केले होते की गुन्हा दाखल करण्यात आला, वसंत मोरेंचा सवाल

कात्रज: शनिवारी कात्रज चौक तसेच कात्रज कोंढवा रोड या ठिकाणी पुणे महानगरपालिका आयुक्त महानगरपालिकेचे अधिकारी तसेच आमदार योगेश टिळेकर यांचा पाहणी दौरा होता. यादरम्यान शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्याकडून २५ ते ३० कार्यकर्ते घेऊन आंदोलन करण्यात आले होते.

या आंदोलनादरम्यानवसंत मोरे व त्यांच्यासोबत असलेल्या समर्थकांनी घोषणाही दिल्या होत्या.कात्रज चौकातील संजय गुगळे यांची ३९ गुंठे जागा पालिकेने ताब्यात घेऊन मोबदला म्हणून २१ कोटी दिले.मात्र प्रत्यक्षात जागेवर ३९ गुंठे क्षेत्र भरत नसून पन्नास वर्षांपूर्वी ताब्यात आलेल्या पंपिंग स्टेशन व राजीव गांधी प्राणी संग्रहालयाची जागेचे पैसे दिले का ?पालिकेने पैसे दिलेली जागा मोजून दाखवावी.या सर्व प्रकारची वरिष्ठ स्तरावर चौकशी करून दोषींवर कारवाई करावी.तसेच १९७२ मध्ये कात्रज गावठाण लगतचा दुष्काळात तयार झालेला आणि उपयुक्त रस्ता निवासी झोन होतो कसा.गावाचा रस्ता बंद करण्याची दिवा स्वप्न पाहू नका असा इशारा शिवसेना उबाठा चे नेते वसंत मोरे यांनी दिला होता . तसेच उपस्थित अधिकाऱ्यांना याचा जाब विचारण्यात आला होता. त्यानंतर वसंत मोरे यांच्यावर भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे कोणतिही परवानगी न घेता आंदोलन केल्याबद्दल जमावबंदी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काल जो पुणे महानगरपालिका आयुक्त व आमदार योगेश टिळेकर यांचा दौरा होता. त्यासाठी आमचा विरोध नव्हता. स्थानिक लोक प्रतिनिधी म्हणून सर्वपक्षीय नगरसेवकांना यांनी का डावलले. मागील पंधरा वर्षापासून आम्ही कात्रज व परिसरात दिवस रात्र झटून कामे करत आहोत ते यांना दिसत नाही का. कात्रज मध्ये यांचं काय योगदान आहे हे यांनी दाखवून द्यावं. मागील अनेक वर्षापासून कात्रज कोंढवा रोड रखडला आहे. त्याचे अपयश झाकण्यासाठी हे या गोष्टी करत आहेत का? एवढे वर्ष तुम्हाला कात्रज कोंढवा रोड दिसला नाही का? आम्ही आंदोलने करायची का नाहीत असं काय आंदोलन केले होते की गुन्हा दाखल करण्यात आला.- वसंत मोरे, नेते शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे)

टॅग्स :PuneपुणेVasant Moreवसंत मोरेShiv SenaशिवसेनाagitationआंदोलनPoliceपोलिसkatrajकात्रजKondhvaकोंढवा