Election Someshwar Sugar Factory: उमेदवारी न मिळाल्याने केळाचे फ्लेक्स लावून निषेध

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2021 09:08 PM2021-10-04T21:08:17+5:302021-10-04T21:08:30+5:30

सोमेश्वर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत वाघळवाडी गावाला पुन्हा डावलण्यात आल्याने नाराज कार्यकत्यांनी फ्लेक्स लावून निषेध केला

Protest with villagers candidate election someshwar sugar factory | Election Someshwar Sugar Factory: उमेदवारी न मिळाल्याने केळाचे फ्लेक्स लावून निषेध

Election Someshwar Sugar Factory: उमेदवारी न मिळाल्याने केळाचे फ्लेक्स लावून निषेध

Next
ठळक मुद्देफलकाची दिवसभर गावासह जिल्ह्यात चर्चा

सोमेश्वरनगर : सोमेश्वर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुरुस्कृत सोमेश्वर विकास पॅनेलची यादी जाहीर झाली. यामध्ये वाघळवाडी गावाला पुन्हा डावलण्यात आल्याने नाराज कार्यकत्यांनी काळ्या बोर्ड वर केळाचे फ्लेक्स लावून निषेध केला. या फलकाची दिवसभर गावासह जिल्ह्यात चर्चा होती. 

काल रात्री काही वेळच हा फ्लेक्स लावण्यात आला.  पोलिसांनी मध्यस्थी करत हा बोर्ड उतरवला. मात्र, काल रात्री पासून सोशल मीडियावर याच फ्लेक्सची चर्चा सुरू आहे. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने पॅनल जाहीर केले. हा पॅनल जाहीर केल्यानंतर कार्यक्षेत्रात चर्चा नाही. मात्र, अनेक गावांमधून नाराजी उमटली आहे. याचा परिणाम म्हणजे वाघळवाडी परिसरात केळाचे चित्र असलेला फलक प्रसिद्ध करण्यात आला. यामुळे खळबळ उडाली. सोमेश्वर सहकारी काल साखर कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भातील राष्ट्रवादीच्या सोमेश्वर विकास पॅनलची यादी जाहीर करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीच्या पॅनलमध्ये उमेदवारी मिळण्यासाठी गर्दी जास्त होती. अर्जही अधिक आले होते. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी मेळाव्यातच कोणीही रुसू नका कोणाची मनधरणी करणार नाही असे आधीच स्पष्ट केले होते.

कारखाना स्थापनेपासून वाघळवाडी गावाला संचालक पदाची संधी नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी एकत्र येत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वाघळवाडी गावाला संधी मिळावी अशी मागणी केली होती मात्र संधी न मिळाल्याने फ्लेक्स च्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली. 

Web Title: Protest with villagers candidate election someshwar sugar factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.