राष्ट्रध्वजास अर्धनग्न सलामी देत नोंदवला निषेध; नगरपरिषदेच्या प्रांगणातील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2023 15:33 IST2023-08-15T15:31:50+5:302023-08-15T15:33:53+5:30
इंदापूर ( पुणे ) : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नगरमध्ये नागरी दलितेतर विकास योजनेत अंतर्गत ...

राष्ट्रध्वजास अर्धनग्न सलामी देत नोंदवला निषेध; नगरपरिषदेच्या प्रांगणातील प्रकार
इंदापूर (पुणे) : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नगरमध्ये नागरी दलितेतर विकास योजनेत अंतर्गत झालेली कामे बोगस व निकृष्ट दर्जाची असल्याचा दावा करत, त्या कामांची चौकशी व्हावी अशी मागणी केली होती. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या मागणीला थंडा प्रतिसाद मिळाल्याने रिपाइंचे पुणे जिल्हा संघटक सचिव शिवाजीराव मखरे यांनी आज नगरपरिषदेच्या प्रांगणात स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहणाच्या वेळी राष्ट्रध्वजास अर्धनग्न सलामी देत निषेध नोंदवला.
आम्ही या देशाचे नागरिक आहोत. देशाच्या तिरंग्याचा आम्हाला अभिमान व गर्व आहे. केवळ प्रशासनाच्या मनमानी कारभाराला कंटाळून अशी सलामी देण्याचा निर्णय आपण घेतला आहे. याची दखल घेतली गेली नाही तर तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा मखरे यांनी प्रशासनाला दिला आहे.