काळे डीपी ठेवून नेटकऱ्यांनी कठुअा घटनेचा नाेंदवला निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 15:17 IST2018-04-16T15:12:43+5:302018-04-16T15:17:29+5:30
कठुअा येथे घटलेल्या अमानूष घटनेनंतर भारतात एक संतापाची लाट उसळली अाहेत. या घटनेचा निषेध करण्यासाठी नेटकऱ्यांची सुद्धा एक चळवळ उभी राहत असून काळ्या रंगाचे डिपी ठेवून या घटनेचा निषेध नाेंदविण्यात येत अाहे.

काळे डीपी ठेवून नेटकऱ्यांनी कठुअा घटनेचा नाेंदवला निषेध
पुणे : देशाला हादरवून साेडलेल्या कठुअा बलात्कार व खून प्रकरणावर सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जाताेय. अाराेपींनी फाशीची शिक्षा व्हावी ही मागणी जाेर धरत अाहे. साेशल मिडीयावरही या घटनेचा निषेध करण्यात येत असून अनेकांनी अापले व्हाटस् अॅप अाणि फेसबुकचे डीपी काळे ठेवत अापला निषेध नाेंदवित अाहेत.
अाठ वर्षाच्या मुलीवर पाशवी अत्याचार करुन तिचा खून केल्याची घटना जम्मू मध्ये घडल्याचे समाेर अाल्यानंतर देशभरात संतापाची लाट पसरली अाहे. ठिकठिकाणी निषेध व्यक्त करण्यात येत अाहे. रविवारी पुण्यातही गुडलक चाैकात जमून निषेध नाेंदविण्यात अाला. यावेळी माेठ्या संख्येने तरुण या निषेधात सहभागी झाले हाेते. त्याचबराेबर गेल्या दाेन दिवसांपासून नेटकऱ्यांनी अापल्या व्हाॅट्स अॅप व फेसबुकचे डीपी काळे ठेवत या घटनेचा निषेध नाेंदविताना दिसत अाहेत. त्याचबराेबर जस्टीस फाॅर असिफा हा हॅशटॅगही वापरला जात अाहे. त्याचबराेबर विविध पाेस्ट्स मधून भाजपालाही लक्ष करण्यात येत अाहे.
याबाबत अादिती पाेटे म्हणाली, काळे डिपी ठेवून या घटनेचा एक प्रकारे निषेध नाेंदविला जात अाहे. प्रत्येकाला माेर्चात किंवा अांदाेलनात सहभागी हाेता येत नाही. त्यामुळे काळे डिपी ठेवून का हाेईना या घटनेचा निषेध नाेंदवून चिमुकलीला न्याय मिळवून देणाऱ्यांच्या साेबत अाम्ही सुद्धा अाहाेत हे सांगण्यासाठी असे डिपी ठेवण्यात येत अाहेत. असे डिपी ठेवून माेठी क्रांती जरी हाेणार नसली तरी अांदाेलन करणाऱ्यांना अाम्ही सर्वजण त्यांच्या साेबत अाहाेत. हा अाधार त्यांना यातून मिळत अाहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिकत असलेला भागवत देशमुख म्हणाला, कठुअामध्ये घडलेली घटना दुर्देवी अाहे. गुन्हेगार हा गुन्हेगार असताे त्यामुळे या घटनेला जातीय रंग देण्यात येऊ नये या भावनेतून तसेच या घटनेचा निषेध म्हणून हा डीपी ठेवला अाहे. असे डिपी अनेकांनी ठेवले अाहेत. यातून सरकारला सतेच समाजाला एक संदेश जाणार अाहे. तसेच अाम्ही अांदाेलन करणाऱ्यांच्या साेबत अाहाेत हेही यातून सांगण्याचा प्रयत्न अाहे.