पुरंदर, भोरला राष्ट्रवादीचे सरकारविरोधात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 06:23 AM2017-10-05T06:23:35+5:302017-10-05T06:23:55+5:30

‘केंद्रातील व राज्यातील भाजपा-शिवसेना सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे, त्यामुळे सामान्य नागरिक हवालदिल झाला आहे.

The protest against Purandar, Bhorla Nationalist Congress | पुरंदर, भोरला राष्ट्रवादीचे सरकारविरोधात आंदोलन

पुरंदर, भोरला राष्ट्रवादीचे सरकारविरोधात आंदोलन

Next

सासवड : ‘केंद्रातील व राज्यातील भाजपा-शिवसेना सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे, त्यामुळे सामान्य नागरिक हवालदिल झाला आहे. या सामान्य माणसाला आधार देण्याचे काम राष्ट्रवादी करीत आहे,’ असे प्रतिपादन बारामती मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सासवड येथे केले.
केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सासवड येथे एल्गार आंदोलन करण्यात आले. त्या वेळी झालेल्या सभेत सुळे बोलत होत्या. राष्ट्रवादीच्या वतीने शहरातून मोर्चा काढण्यात आला.
केंद्रात व राज्यात भारतीय जनता पार्टी व शिवसेना सत्तेत आल्यापासून शेतकºयांच्या प्रश्नावर योग्य पावले उचलली नाहीत. राज्यात १५ हजार शेतकºयांनी आत्महत्या केल्या, अशी महाराष्ट्राच्या वाट्याला बदनामी आली. विरोधीपक्षाच्या संघर्ष यात्रेनंतर व शेतकºयांच्या संपामुळे सरकारने कर्जमाफी जाहीर केली, पण आॅनलाइनमुळे शेतकºयांना अर्जच भरता आले नाहीत. बळीराजाला बोगस म्हणणाºया बोलघेवड्या सरकारला हुसकावून लावण्याची वेळ आली असल्याचे सुळे यांनी यावेळी सांगितले.
सरकारने जाहीर केल्याप्रमाणे सर्व शेतकºयांना सरसकट कर्जमाफी द्यावी, शेतीमालाचा उत्पादन खर्च व अधिक ५० टक्के नफा मिळवून हमीभाव द्यावा, कृषी मालाची खरेदी करावी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, रब्बी हंगामासाठी शेतकºयांना पीक कर्ज तातडीने देण्यात यावे अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. तहसीलदार सचिन गिरी यांनी निवेदन स्वीकारले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शिवाजी पोमण, जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, माजी जिल्हा परिषद सदस्य, सुदाम इंगळे, सारिका इंगळे, विराज काकडे, बबूसाहेब माहूरकर, जिल्हा बँकेचे संचालक दिगंबर दुर्गाडे, माजी सभापती गौरीताई कुं जीर, माजी उपसभापती माणिक झेंडे पाटील, योगेश फडतरे, राहुल शेवाळे, सासवड शहर अध्यक्ष संतोष जगताप, बंडूकाका जगताप, दत्तानाना जगताप, महेश जगताप इ. उपस्थित होते.
 

Web Title: The protest against Purandar, Bhorla Nationalist Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.