पुण्यातील मुकुंदनगरमध्ये मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; व्यवस्थापकासह ५ जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 06:54 PM2018-01-08T18:54:23+5:302018-01-08T18:59:08+5:30

‘आॅरा थाई स्पा अँड सलून’च्या मुकुंद नगर येथील शाखेत मसाजच्या नावाखाली सुरु असलेला वेश्याव्यवसाय पोलिसांच्या गुन्हे शाखेने उघड केला.

Prostitution in the name of Massage in Mukundnagar, Pune; filled complaint 5 offenders with manager | पुण्यातील मुकुंदनगरमध्ये मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; व्यवस्थापकासह ५ जणांवर गुन्हा

पुण्यातील मुकुंदनगरमध्ये मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; व्यवस्थापकासह ५ जणांवर गुन्हा

Next
ठळक मुद्देस्पाच्या व्यवस्थापकासह पाच जणांवर दाखल करण्यात आला गुन्हाथालंडमधील ४ महिलांची सुटका, ३ लाख १४ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त

पुणे : देशभरात साखळी असलेल्या प्रसिद्ध ‘आॅरा थाई स्पा अँड सलून’च्या मुकुंद नगर येथील शाखेत मसाजच्या नावाखाली सुरु असलेला वेश्याव्यवसाय पोलिसांच्या गुन्हे शाखेने उघड केला. स्पाच्या व्यवस्थापकासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, चार थायलंडच्या महिलांची येथून सुटका करण्यात आली. 
प्रशांत रमाकांत बोधे (वय ३८, रा. पुण्याई कॉम्पलेक्स, के. के. मार्केट जवळ, धनकवडी), महेश गणेश लांडगे (वय २४, का. धवलगिरी सोसायटी जवळ, मुकुंद नगर), दर्शन नरेन शहा, मलिक कासिफ खान, इद्रीस बद्री (रा. मुंबई) यांच्या विरोधात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. गुन्हे शाखेतील पोलीस हवालदार नितीन तरटे व राजेश उंबरे यांना मुकुंदनगरच्या सुजय गार्डन बिल्डींगमधील आलिशान स्पा मध्ये वेश्याव्यवसाय चालत असल्याची माहिती मिळाली होती. परदेशी मुलींना नोकरीचे आणि अधिक पैशाचे आमीष दाखवून वेश्याव्यवसाय करवून घेत असल्याचे पोलिसांना समजले होते. गुन्हे शाखेच्या पथकाने याची खातरजमा करुन, त्यावर छापा टाकला. 
येथून थालंडमधील ४ महिलांची सुटका करण्यात आली. तसेच येथून रोख रक्कम, मोबाईल फोन आणि इतर साहित्य असा ३ लाख १४ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. या प्रकरणी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यांतर्गत पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
अप्पर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, सहायक पोलीस आयुक्त संजय निकम, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय पाटील, चंद्रकांत जाधव, शीतल भालेकर, नितीन तरटे, कविता नलावडे, गितांजली जाधव, रुपाली चांदगुडे, सरस्वती कागणे, स्वारगेट पोलीस स्टेशनचे निरीक्षक फारुक काझी यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

Web Title: Prostitution in the name of Massage in Mukundnagar, Pune; filled complaint 5 offenders with manager

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे