वाकड येथे लाॅजमध्ये वेश्याव्यवसाय; पीडित महिलेची सुटका
By नारायण बडगुजर | Updated: December 25, 2023 09:02 IST2023-12-25T09:01:39+5:302023-12-25T09:02:00+5:30
गौतम आणि फईम उर्फ एम. डी. या दोन्ही संशयितांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल

वाकड येथे लाॅजमध्ये वेश्याव्यवसाय; पीडित महिलेची सुटका
पिंपरी : लाॅजमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करून पीडित महिलेची सुटका केली. वाकड पोलिसांनी ताथवडे येथील साई लाॅजवर शनिवारी (दि. २३) सायंकाळी सहाच्या सुमारास छापा मारून ही कारवाई केली.
गौतम आणि फईम उर्फ एम. डी. या दोन्ही संशयितांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिस अंमलदार ललीता भरसट यांनी याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताथवडे येथील साई लाॅज येथे वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार वाकड पोलिसांनी कारवाई करून वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला. यात पीडित महिलेची सुटका केली. संशयित हे पीडित महिलेकडून वेश्याव्यवसाय करवून घेत असल्याचे समोर आले. सहायक पोलिस निरीक्षक अनिल लोहार तपास करीत आहेत.