लॉकडाऊनमध्ये कोरेगाव पार्कला बहरला वेश्या व्यवसाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:12 AM2021-05-07T04:12:35+5:302021-05-07T04:12:35+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्यभरात लॉकडाऊन जाहीर झाला असून, अगदी जीवनावश्यक वस्तूंनाही मर्यादित काळासाठी उघडण्यास परवानगी आहे. असे ...

Prostitution flourishes in Koregaon Park in lockdown | लॉकडाऊनमध्ये कोरेगाव पार्कला बहरला वेश्या व्यवसाय

लॉकडाऊनमध्ये कोरेगाव पार्कला बहरला वेश्या व्यवसाय

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : राज्यभरात लॉकडाऊन जाहीर झाला असून, अगदी जीवनावश्यक वस्तूंनाही मर्यादित काळासाठी उघडण्यास परवानगी आहे. असे असताना कोरेगाव पार्कमध्ये उघडपणे मसाज पार्लर केवळ सुरूच नव्हती, तर तेथे वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे सामाजिक सुरक्षा विभागाने टाकलेल्या छाप्यात आढळून आले आहे. यापूर्वीच्या कडक लॉकडाऊनमध्ये कोरेगाव पार्कमध्ये असे प्रकार आढळून आले होते.

कोरेगाव पार्क परिसरातील योगनिद्रा व फेमिना स्पा हे मसाज सेंटर सुरू असून तेथे वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. त्यानुसार साध्या वेशात बनावट ग्राहक पाठवून पोलिसांनी खात्री केली. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकला असता तेथे ९ मुलींकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात असल्याचे आढळून आले. योगनिद्रा स्पामधील मॅनेजर शुभम प्रेमकुमार थापा (वय २२, रा. आसाम) आणि फेमिना स्पा मधील मॅनेजर अफताबउद्दीन नुरुद्दीन (वय २७, रा. कोरेगाव पार्क) यांना अटक केली आहे. स्पा मालक चांद बिबी रमजान मुजावर व अब्दुल आसिफ हे फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

Web Title: Prostitution flourishes in Koregaon Park in lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.