मसाज सेंटरच्या नावाखाली देहविक्रय व्यवसाय, दहा पीडित मुलींची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 09:30 PM2021-03-13T21:30:17+5:302021-03-13T21:31:13+5:30

नॅचरल बॉडी स्पा मसाज सेंटरवरील घटना

Prostitution business under the name of massage center, release of ten victim girls | मसाज सेंटरच्या नावाखाली देहविक्रय व्यवसाय, दहा पीडित मुलींची सुटका

मसाज सेंटरच्या नावाखाली देहविक्रय व्यवसाय, दहा पीडित मुलींची सुटका

googlenewsNext
ठळक मुद्देगुन्हे शाखेने छापा टाकून केली मुलींची सुटका

कोरेगाव पार्क येथील नँचरल बॉडी स्पा या मसाज सेंटरवर गुन्हे शाखेने छापा टाकून  देहविक्रय व्यवसाय उघडकीस आणला. या सेंटरवर कारवाई करून नागालँंड व मणिपूर , राजस्थान, मुंबई व सोलापूर च्या मूळ रहिवासी असलेल्या दहा पीडित मुलींची सुटका करण्यात आली. याप्रकरणी स्पा सेंटरच्या
मँनेजरला अटक करण्यात आली आहे.

अर्जुन गोपाल सिंग (वय 21) असे अटक केलेल्याचे नाव आहे. स्पा मालक विकास ढाले हा फरार असून, त्याचा शोध सुरू आहे. याबाबत कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्यामाहितीनुसार, नँचरल बॉडी स्पा मध्ये मसाज सेंटरच्या नावाखाली देहविक्रय व्यवसाय चालत असल्याची माहिती गुन्हे 2 चे सहाय्यक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांना मिळाली. या ठिकाणी बनावट गि-हाईल पाठवून खात्री करण्यात आली. त्यात या ठिकाणी देहविक्रय व्यवसाय सुरू असल्याचे निष्पन्न झाले. सर्व पीडित मुलींची सुटका करून त्यांना  महिला संरक्षण गृहात ठेवण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक अनघा देशपांडे, पोलीस उप निरीक्षक श्रीधर खडके तसेच पोलीस अंमलदार सुधीर इंगळे, राहुल सकट, आण्णा माने, बाबा कर्पे, काशिनाथ पुजारी, इरफान पठाण, संतोष भांडवलकर, प्रफुल्ल गायकवाड, नीलम शिंदे, मनीषा पुकाळे व संगीता जाधव यांनी ही कारवाई केली आहे.

Web Title: Prostitution business under the name of massage center, release of ten victim girls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.