आळंदी: तीर्थक्षेत्र आळंदी परिसरातील देहू फाटा येथे असलेल्या 'हॉटेल साई पॅलेस'मध्ये सुरू असलेल्या मोठ्या सेक्स रॅकेटचा दिघी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी १७ पीडित महिलांची सुटका केली असून ६ जणांना अटक करण्यात आली आहे. हॉटेलचा मालक आणि चालक सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेल साई पॅलेस येथे महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेतला जात होता. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी आरोपी या महिलांचा वापर करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून हॉटेलवर धाड टाकली. या कारवाईत पोलिसांनी ५१ हजार ७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी कृष्णा सुरेश पाटील (मॅनेजर), राज मोहन शेट्टी (मॅनेजर), संजय अमीन बावरी, साबीर अक्तर अली आणि भरत दत्तात्रय बिराजदार यांना अटक केली आहे. मात्र, हॉटेलचा मालक अवघुत गाढवे आणि हॉटेल चालक पद्मलोचन दास हे पोलिसांच्या हाती लागले नसून ते फरार झाले आहेत. यासोबतच विक्रम हिरा वढ या आरोपीचाही पोलीस शोध घेत आहेत. पोलीस शिपाई महेश भारत लाडे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली असून दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक (गुन्हे) पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. या रॅकेटचे जाळे कुठेपर्यंत पसरले आहे आणि यामध्ये आणखी कोणाचे हितसंबंध आहेत, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.
Web Summary : Police busted a sex racket at Hotel Sai Palace in Alandi, rescuing 17 women. Six people were arrested. The hotel owner and manager are on the run. Police seized ₹51,070. Investigation underway.
Web Summary : आलंदी के होटल साई पैलेस में पुलिस ने देह व्यापार रैकेट का भंडाफोड़ किया, 17 महिलाओं को छुड़ाया। छह गिरफ्तार। होटल मालिक और प्रबंधक फरार। ₹51,070 जब्त। जांच जारी।