शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

शहरभर योग केंद्रे उभारण्याचा प्रस्ताव ‘शवासना’त

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 6:00 AM

गेल्या तीन वर्षांत शहरामध्ये एकही योग केंद्र सुरु झाले नाही.

ठळक मुद्देयोग केंद्रासाठी तीन वर्षांत अंदाजपत्रकामध्ये केवळ तरतुदचवर्षा अखेरपर्यंत किमान तीन योग केंद्र सुरु करणार 

पुणे: महापालिकेत सत्तेवर आल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आपल्या पहिल्या अंदाजपत्रकामध्ये पुणेकर नागरिक व त्यांचे आरोग्यासाठी विविध योजना हाती घेतल्या. यामध्ये शहराच्या विविध भागात योग केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी सलग तीन वर्षांच्या अंदाजपत्रकांमध्ये कोट्यवधी रुपयांची तरतुद देखील केली. परंतु, गेल्या तीन वर्षांत शहरामध्ये एकही योग केंद्र सुरु झाले नाही. महापालिकेच्या अकार्यक्षम प्रशासनामुळे दर वर्षी योग केंद्रां निधी परत गेला आहे. महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे पहिले अंदाजपत्रक सादर करताना शहरातील युवक, ज्येष्ठ नागरिक, महिलासह समाजातील सर्व घटकांना भारतीय योग शास्त्राची ओळ व्हावी, त्याचा नियमित योगाभ्यास घडवून नागरिकांचे आरोग्य बलशाली व रोगमुक्त करण्यासाठी शहराच्या विविध भागात योग केंद्र उभारण्याची घोषणा केली. यासाठी अंदाजपत्रकामध्ये तब्बल १ कोटी ५० लाख रुपयांची तरतुद देखील केली. परंतु, पहिल्या वर्षांत आरोग्याच्या इतर अनेक योजनासोबतच योग केंद्र उभारण्याचा निर्णय कागदावरच राहिला. त्यानंतर नव्याने स्थायी समिती अध्यक्ष झालेल्या योगेश मुळीक यांनी देखील आपल्या अंदाजपत्रकामध्ये महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या सर्व १३६ इमारती व शहरातील सर्व उद्यानांमध्ये योग प्रशिक्षणासाठी जागा उपलब्ध करुन देणे व योग केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी अंदाजपत्रकामध्ये २ कोटी रुपयांची भरीव तरतुद देखील करण्यात आली. परंतु अद्यापही ही योग केंद्र उभारण्याबाबत प्रशासनाच्या पातळीवर कोणत्याही उपाय-योजना करण्यात आल्या नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे गेली तीन वर्षे योग केंद्राचा निधी खर्च न झाल्याने अन्य कामांसाठी वळविण्यात आल्याची वस्तुस्थिती समोर आली.-------------------वर्षा अखेरपर्यंत किमान तीन योग केंद्र सुरु करणार पुणेकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने शहराच्या प्रत्येक भागात योग केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दृष्टीने प्रयत्न सुरु असून, शहरातील बाणेर, धनकवडी आणि आंबेगाव बु. येथे अ‍ॅमेनिटी स्पेसच्या जागांची पाहणी करून येथे मल्टिपर्पज हॉल उभारण्यात येणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने योग केंद्र ही संकल्पना घेऊन सर्व ठिकाणी योगा थिमवर एकसारखी केंद्र उभारण्याचे नियोजन सुरु आहे. या वर्षा अखेरपर्यंत किमान तीन केंद्र सुरु करण्याचे नियोजन आहे...-मुक्ता टिळक, महापौर

टॅग्स :PuneपुणेYogaयोगPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाMukta Tilakमुक्ता टिळक