शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

कंपनीऐवजी ठेकेदाराकडून डांबर खरेदीचा प्रस्ताव

By admin | Updated: June 11, 2015 06:12 IST

शहरातील रस्त्यांची दुरुस्ती, डांबरीकरण या कामांसाठी महापालिकेकडून दर वर्षी थेट कंपन्यांकडून डांबर खरेदी केली जाते, मात्र यंदा कंपन्याऐवजी

पुणे : शहरातील रस्त्यांची दुरुस्ती, डांबरीकरण या कामांसाठी महापालिकेकडून दर वर्षी थेट कंपन्यांकडून डांबर खरेदी केली जाते, मात्र यंदा कंपन्याऐवजी ठेकेदाराकडून १ हजार मेट्रिक टन डांबर खरेदी करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीसमोर मांडला आहे. ठेकेदाराकडून जास्त डिस्काउंट दिला जाणार असल्याचे कारण देऊन हा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. स्थायी समितीच्या निर्णयावर या डांबर खरेदीचे भवितव्य अवलंबून आहे.शहरातील मुख्य रस्त्यांसह प्रभागातील रस्त्यांचे डांबरीकरण, दुरूस्ती याकरिता महापालिकेला दर वर्षी हजारो मेट्रिक टन डांबराची आवश्यकता भासते. डांबर तयार करणाऱ्या कंपन्यांकडून महापालिका दर वर्षी या डांबराची खरेदी करीत होती. मात्र, या वर्षी अचानक ठेकेदारांकडून डांबर खरेदी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्याकरिता निविदाप्रक्रिया राबवून त्यांनी सर्वांत जास्त डिस्काऊंट देणाऱ्या ठेकेदाराची निवड केली. त्यानुसार या ठेकेदाराकडून १ हजार मेट्रिक टन डांबर खरेदी करण्याचा प्रस्ताव त्यांनी स्थायी समितीसमोर मांडला आहे.निविदा प्रक्रियेनुसार निवड करण्यात आलेल्या ठेकेदाराने १५ टक्के डिस्काउंट देण्याची तयारी दाखविली आहे. जर,डांबर बनविणाऱ्या कंपन्यांना सवलतीच्या दरात डांबर देणे शक्य नसेल, तर या कंपन्यांकडून डांबर खरेदी करून पालिकेला देणारा ठेकेदार इतक्या सवलतीच्या दरात डांबर कसा पुरवू शकेल, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ठेकेदाराने डांबर पुरविले, तरी त्या डांबरचा दर्जा निश्चितच चांगला नसणार आहे. डांबर पुरविणाऱ्या कंपन्यांकडून टक्केवारी मिळत नसल्याने या खरेदीप्रक्रियेत ठेकेदार आणला जात असल्याची चर्चा महापालिकेमध्ये सुरू आहे. (प्रतिनिधी)