शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा प्रशासनातर्फे चा-यासाठी राज्य शासनाकडे १०० कोटींचा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2018 17:56 IST

दुष्काळात केवळ नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून चालणार नाही तर जनावरांसाठी चारा उपलब्ध करून द्यावा लागणार आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात जनावरांसाठी लागणारा चारा सर्व साधारणपणे जानेवारी महिन्यापर्यंत मारे अडीच मेट्रिक टन अतिरिक्त चा-याचे जिल्हा व शासनाच्या विविध योजनांमधून नियोजनकोरड्या पडलेल्या जलाशयाच्या जमिनीत चारा पिके घेण्याचे आदेश

पुणे: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे जनावरांच्या चा-याचे नियोजन करण्यात आले असून चा-यासाठी राज्य शासनाला १०० कोटींचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. जानेवारीपासून जूनपर्यंत अडीच मेट्रिक टन चारा उपलब्ध करून देण्याबाबत उपाययोजना करण्यात आल्या आहेत, असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.  राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून पुणे जिल्ह्यातील अनेक भागात जनावरांसाठी चारा उपलब्ध नाही.त्यामुळे दुष्काळात केवळ नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून चालणार नाही तर जनावरांसाठी चारा उपलब्ध करून द्यावा लागणार आहे. जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात चारा नियोजनाबाबत बैठक घेण्यात आली. त्यात संबंधित अधिका-यांना चारा उपलब्धतेबाबत सूचना करण्यात आल्या. तसेच पाणी नसलेल्या जलाशयाच्या किती एकर जमिनीमध्ये चारा पिके घेता येतील.याबाबतची माहिती येत्या सात दिवसात सादर करण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत.  नवल किशोर राम म्हणाले, जिल्ह्यात जनावरांसाठी लागणारा चारा सर्व साधारणपणे जानेवारी महिन्यापर्यंत पुरतो. जानेवारी महिन्यानंतरच्या चा-यासाठी शंभर कोटींचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. प्रशासनातर्फे जानेवारी महिन्यापासून जूनपर्यंतच्या चा-याचे नियोजन काण्यात आले असून सुमारे अडीच मेट्रिक टन अतिरिक्त चा-याचे जिल्हा व शासनाच्या विविध योजनांमधून नियोजन केले आहे. जिल्ह्यातील बहुतांश जलाशयातील पाणी संपले आहे.त्यामुळे कोरड्या पडलेल्या जलाशयाच्या जमिनीत चारा पिके घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.दुष्काळी परिस्थितीत गाळपेरा किंवा इतर भागात केवळ चारा पिके घेतेली जाणार असून शेतक-यांंना आवश्यक बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.यासंदर्भात संबंधित अधिका-यांची बैठक घेण्यात आली आहे. 

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीNavalkishor Ramनवलकिशोर रामState Governmentराज्य सरकारdroughtदुष्काळ