शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

संशोधक विद्यार्थ्यांना विद्यापीठाचे प्रोत्साहन

By admin | Updated: February 3, 2015 01:00 IST

राज्यस्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना करिअरच्या दृष्टीने प्रोत्साहन देण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुढाकार घेणार आहे.

पुणे : राज्यस्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना करिअरच्या दृष्टीने प्रोत्साहन देण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुढाकार घेणार आहे. त्याबाबत प्राथमिक स्तरावर चर्चा सुरू असून, लवकरच निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती विद्यापीठातील सूत्रांनी दिली.नागपूर येथे झालेल्या विद्यापीठस्तरीय नवव्या आविष्कार संशोधन स्पर्धेत विद्यापीठाने सातव्यांदा सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. संशोधन प्रकल्पांसाठी विद्यापीठातील विविध शाखांतील ८ विद्यार्थ्यांनी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला असून, ६ विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांना दुसरा क्रमांक मिळाला आहे. या विद्यार्थ्यांना राज्यपाल कार्यालयाकडून विशेष शिष्यवृत्ती मिळणार आहे. तसेच, एखादा प्रकल्प सर्जनशील असल्यास त्याला पेटंटसाठी विद्यापीठाकडून मदत केली जाईल. आविष्कार स्पर्धेनंतर दर वर्षी साधारणपणे हीच प्रक्रिया राबविली जाते.विद्यापीठाने स्पर्धेत क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांकडून त्यांच्या प्रकल्पांची सविस्तर माहिती मागविली आहे. या माहितीच्या आधारे संबंधित विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरच्या दृष्टीने संशोधनात प्रोत्साहन देण्याचा विद्यापीठाचा विचार आहे. याबाबत प्राथमिक स्तरावर चर्चा झाली असून, वर्धापन दिनाच्या कार्यक्रमानंतर त्यावर अखेरचा हात फिरविला जाणार आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले.(प्रतिनिधी)४आविष्कार स्पर्धेत प्रकल्प सादर केलेल्या विद्यार्थ्यांना पुढील संशोधनासाठी किंवा नावीन्यपूर्ण प्रकल्पाला प्रत्यक्ष सामाजिक जीवनात आणण्यासाठी फारसा वाव मिळत नाही. ४त्यामुळे अनेक चांगले प्रकल्प स्पर्धेच्या पातळीपर्यंतच सीमित राहतात. त्यांत गुणवत्ता असूनही योग्य व्यासपीठ न मिळाल्याने ते प्रत्यक्षात येत नाहीत. ४या सर्व गोष्टींचा विचार करून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने यासाठी पुढाकार घेतला आहे.