शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

१ कोटी १९ लाख रुपयांची प्रतिबंधित दारू पकडली; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

By नितीश गोवंडे | Updated: November 2, 2023 15:41 IST

मुंबई - बंगळुरू महामार्गावर रावेत भागात करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी तब्बल ७५ लाखांच्या ४३ हजार दारूच्या बाटल्या जप्त केल्या

पुणे : विदेशी आणि फक्त गोवा राज्यात विक्री करण्यासाठी परवानगी असलेल्या विदेशी दारूचा ट्रक पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पकडला. मुंबई - बंगळुरू महामार्गावर रावेत भागात करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी तब्बल ७५ लाखांच्या ४३ हजार दारूच्या बाटल्या जप्त केल्या. कुणाला संशय येवू नये म्हणून आरोपींनी ट्रकच्या पाठीमागे जनावरांचे खाद्य असलेल्या गोण्या टाकून पुढील बाजूला हा मुद्देमाल ठेवला होता. पुष्पा स्टाईल सुरू असलेली ही वाहतूक उत्पादन शुल्क विभागाने उघडकीस आणून दोघांना अटक करत १ कोटी १९ लाख ९२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

विजय चंद्रकांत चव्हाण (५३, रा. सातारा), सचिन निवास धोत्रे (३१, रा. सांगली) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. आरोपी ट्रकमधून रॉयल ब्लू व्हिस्की, मॅजिक ऑरेंज, रॉयल ब्लंक, व्होडका या विदेशी मद्याची वाहतूक करत होते. उत्पादन शुल्क विभागाचे पुणे अधिक्षक चरणसिंग रजपूत यांच्या मार्गदर्शनाखालील पथक हद्दीत गस्तीवर होते. या दरम्यान मुंबई - बंगळुरू महामार्गावरून संशयीतरित्या ट्रक जाणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली. त्यानूसार पथकाने सापळा रचून रावेत भागात ट्रक अडवला. ट्रकची तपासणी केली असता पाठीमागे खतांच्या गोण्या आढळून आल्या. मात्र, गोण्याच्या आतमध्ये छुप्या पद्धतीने दारूचे बॉक्स ठेवल्याचे पथकाला दिसून आले. त्यानूसार पथकाने ट्रकची झडती घेतली असता आतमध्ये ऑरेंज मॅजिक, रॉयल ब्लू व्हिस्कीचे ४३१ बॉक्स, अ‍ॅपल व्होडकाचे ७८५ बॉक्स, किंगफिशरचे ४० बॉक्स मिळून जवळपास ४३ हजार बाटल्या आढळून आल्या. आरोपींकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यानूसार पथकाने दोघांना ताब्यात घेत अटक केली. ट्रकमधून मुंबईकडे ही दारू नेण्यात येणार होती, असे प्राथमिक तपासात समोर आले असून पुढील तपास उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात येत आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पुणे विभागीय उपआयुक्त विजय चिंचाळकर, पुणे अधिक्षक चरणसिंग रजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधिक्षक युवराज शिंदे, एस. आर. पाटील, निरीक्षक दिपक सुपे, प्रविण शेलार, दुय्यम निरीक्षक राम सुपेकर, अशिष जाधव, सागर धुर्वे, डी. के. पाटील, अतुल बारगळे, तात्या शिंदे, अशोक अदमनकर, अंकुश कांबळे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीhighwayमहामार्गMumbaiमुंबईliquor banदारूबंदी