शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

महाराष्ट्राची पुरोगामित्वाची वाटचाल अविरत सुरू ठेवावी लागेल: उर्मिला मातोंडकर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2021 1:48 PM

प्रबोधनकार ठाकरेंच्या विचारांचा वसा बाळगत तरुणाईला पुरोगामी महाराष्ट्र पुढे न्यायचा आहे.

ठळक मुद्दे प्रबोधन शतकोत्सव महोत्सवाचे उदघाटन

पुणे : 'प्रबोधनकारांशिवाय महाराष्ट्राचा इतिहास पूर्ण होऊच शकत नाही. आयुष्य कधीतरी सुवर्णसंधी देते, तर कधी निराशेच्या गर्तेत फेकते. यातून बाहेर कसे पडायचे, हे 'माझी जीवनगाथा' शिकवते.  वैचारिक गुलामगिरी अजूनही पूर्णत: संपलेली नाही. प्रबोधन या शब्दाचा अर्थ आज दुर्देवाने चुकीच्या अर्थाने वापरला जातो. मानसिक उदबोधन म्हणजे प्रबोधन. यातून होणारी क्रांती असत्यावर, अन्यायावर घाव घालणारी असते. प्रबोधनकार ठाकरेंच्या विचारांचा वसा बाळगत तरुणाईला पुरोगामी महाराष्ट्र पुढे न्यायचा आहे. महाराष्ट्राची पुरोगामित्वाची वाटचाल अविरत सुरू ठेवावी लागेल', असे विचार अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी व्यक्त केले

ज्येष्ठ समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांच्या संपादकत्वाखालील ‘प्रबोधन’ पाक्षिकाच्या शतकोत्सवानिमित्त संवाद पुणेतर्फे प्रबोधन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचा उद्घाटन समारंभ गुरुवारी बालगंधर्व रंगमंदिरात पार पडला. विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोर्‍हे, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव, सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे डॉ. संजय चोरडिया आणि सीमा चोरडिया, संवाद पुणेचे सुनील महाजन, सचिन ईटकर, निकिता मोघे, किरण साळी, हरीश केंची आदी उपस्थित होते.

बाबा आढाव म्हणाले, 'विचारांच्या धाग्यांनी समाजाच्या विचारांची बांधणी होत असते. फुले-शाहू-आंबेडकर, सावित्रीच्या लेकी हे धागे म्हणजे एक विचारधारा आहे. विचारधारेतील धागे काळाच्या ओघात सुटता कामा नयेत. सध्याच्या काळात सुधारणेची चळवळ मागे का पडली आहे, याचा समाजाने विचार करायला हवा.  त्यासाठी प्रबोधनकारांच्या विचारांची गरज आहे. प्रबोधनकार हे सत्यशोधक होते.' सरस्वतीवंदन करायचे, मग महात्मा फुले यांची प्रार्थना का नाही म्हणायची, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, 'शिवसेनेचे हिंदुत्त्व चातुर्वर्ण्य व्यवस्थेचे समर्थन करणारे नाही; ते हिंदुत्त्व प्रबोधनकारी आहे. प्रबोधनकार ठाकरेंचे विचार जाजवल्य आणि प्रखर होते. आजही त्यांच्या विचारांना विविध प्रकारे धुमारे फुटत असतात, अप्रत्यक्ष प्रबोधन विविध मार्गानी होत असते. इतिहासातील नोंदींची धूळ झटकली गेली पाहिजे.प्रबोधनाच्या जाणिवांचा नवा हुंकार निर्माण होण्याची गरज आहे.'

'स्वेच्छा विवाहाचा विषय अजूनही आपल्या समाजाने स्वीकारलेला नाही. त्यातून ऑनर किलिंगच्या भयानक घटना घडतात. जातपंचायतीच्या नावाखाली अनेक चुकीचे प्रकार घडत आहेत. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील सीमारेषा ओळखायला हवी. डिजिटल युगात अंधश्रद्धा, जातीयता नव्या मुखवट्यातून परत समोर येत आहेत. त्याचा सामना विचारांच्या आधाराने करायला हवा', याकडेही गोऱ्हे यांनी लक्ष वेधले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कार्यक्रमासाठी पाठवलेल्या शुभेच्छा संदेशाचे यावेळी वाचन करण्यात आले. सुनील महाजन यांनी प्रास्ताविक केले. स्नेहल दामले यांनी सूत्रसंचालन केले. निकिता मोघे यांनी आभार मानले.

टॅग्स :PuneपुणेUrmila Matondkarउर्मिला मातोंडकरShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे