शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सावित्रीच्या लेकीचा मक्तेदारीला छेद, वाहनदुरुस्ती व पंक्चर काढण्याच्या कामामध्ये निपुणता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 05:42 IST

वाहनांचे पंक्चर काढायचे म्हटले की आपल्या ताकदवान पुरुषाचे रूप आठवते. मात्र, या व्यवसायातील पुरुषांच्या मक्तेदारीला छेद देत वेल्ह्यातील सावित्रीच्या लेकीने आपला ठसा उमटवला आहे.

वेल्हे - वाहनांचे पंक्चर काढायचे म्हटले की आपल्या ताकदवान पुरुषाचे रूप आठवते. मात्र, या व्यवसायातील पुरुषांच्या मक्तेदारीला छेद देत वेल्ह्यातील सावित्रीच्या लेकीने आपला ठसा उमटवला आहे. मागील दहा वर्षांपासून सायकलपासून थेट ट्रक, जेसीबीपर्यंतच्या वाहनांचे पंक्चर्स काढण्यात निर्मला अनंता खोपडे या४२ वर्षीय महिला कुठेही मागे नाहीत.खोपडे या मुळच्या राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या चºहाटवाडी येथील रहिवासी आहेत. कुटुंबाच्या उदरनिवार्हासाठी पती अनंता खोपडे यांनी २० वर्षांपूर्वी वेल्हे येथे पंक्चरचे दुकान टाकले. त्यांना एक मुलगा व दोन मुली असून खर्च व जबाबदाºया वाढल्या. दुकानात कामगार ठेवण्याऐवजी निर्मला यांनी स्वत: कामात मदत करायला सुरुवात केली. १० वर्षांपासून त्यांनी या कामात स्वत:ला वाहून घेतले आहे. सर्व प्रकारच्या मोटारसायकलींच्या टायर्सचे पंक्चर काढणे, कार वॉशिंग, सोबत ट्रॅक्टर, जेसीबी यांसारख्या अवजड वाहनांचे पंक्चर काढणे ही कामे त्या करतात.कुटुंबाचे पालन पोषण करण्यासाठी आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी पतीच्या खांद्याला खांदा लावून त्या काम करत आहेत. एक महिला असे जड काम करताना पाहून सर्वांना आश्चर्य वाटते. त्यांनी ग्रा. पं. सदस्यपदही भूषविले आहे. आॅईल बदली, ब्रेक पॅड, लाईनर बदलणे, ट्युब- टायर बदलणे, काबोर्रेटर साफ करुन देणे आणि किरकोळ दुरुस्ती त्या लीलया करतात. या कामातून त्यांनी ग्रामीण भागातील महिलांपुढे उदाहरण उभे केले आहे.त्यांच्याकडे दुसरे उत्पन्नाचे साधन नाही. थोडीशी भातशेती आहे. या व्यवसायातून दोन्ही मुलींना उच्च शिक्षणाचा मार्ग दिला आहे. मोठी मुलगी प्रणाली सिव्हिल इंजीनियरिंगचे तर दुसरी प्रतीक्षा बी.एस्सी. अ‍ॅग्रीच्या अभ्यासक्रमाला शिकत आहे. या कामात प्रतीक्षादेखील आईला मदत करते. तिलाही त्यांनी पंक्चर काढायला शिकविले आहे. मुलांना आपल्या आईचा अभिमान वाटत असून हे सन्मानाचे जगणे आहे असे वाटते.सुरुवातीला हे काम करताना थोडासा संकोच वाटत होता. लोक काय म्हणतील याची भीती वाटायची. मात्र एक वेगळेच काम की ज्यामधे महिलांचा कधी हात लागला नाही असे गाड्या पंक्चर काढणे, दुरुस्ती करण्याचे काम मला करता येऊ लागल्याने मला आनंद वाटला. माझे पती अनंता खोपडे यांनी मला हे सर्व काम शिकविले. माझे माहेर पुण्यात शुक्रवार पेठेत असून १० वीपर्यंत शिक्षण पुण्यात झाले आहे. वडिलांकडे असताना असे शारीरिक कष्ट कधी केले नाही. परंतु मुलांच्या शिक्षणाचा खर्च पेलण्यासाठी मी स्वत: चाकांना हात लावला.

टॅग्स :Women's Day 2018महिला दिन २०१८Puneपुणे