शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

देशातील सर्वात मोठ्या नैसर्गिक गवताच्या गालिचाची पुण्यात निर्मिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2022 16:05 IST

१००० स्क्वेअर फूट पासपालम ग्रास गालिचाची जागतिक स्तरावर घेतली जात आहे नोंद

पुणे : पर्यावरणाचा होणारा ऱ्हास आणि वाढते प्रदूषण लक्षात घेता पुण्यातील पर्यावरण प्रेमींनी सर्वसामान्य लोकांमध्ये पर्यावरणाचा प्रसार व्हावा. यासाठी देशातील सर्वात मोठ्या नैसर्गिक गवताच्या गालीच्याची निर्मिती केली आहे. त्यांनी तयार केलेल्या १००० स्क्वेअर फुट गालिच्याची जागतिक स्तरावरही नोंद घेतली जात आहे. प्लांटर्स इंडिया लँडस्केपिंग कंपनीच्या जिबॉय तांबी यांनी पुणे सोलापूर रस्त्यालगत कुंजीरवाडी येथे हा प्रकल्प उभारला आहे.

यामध्ये नैसर्गिक रित्या पर्यावरण पूरक गवतापासून गालिचा तयार करण्यात आला आहे. हा गालिचा केवळ घरामध्येच नव्हे तर मोठ्या स्तरावर क्रीडांगणामध्ये, उद्यानांमध्ये, गोफ कोर्समध्ये, घराच्या परसबागेमध्ये ही वापरता येऊ शकतो. हा गालिचा वापरण्यासाठी ही अतिशय सोपा असून तसेच देखभाल खर्च ही अतिशय कमी आहे. दोन ते तीन दिवसातून एकदा या गालिच्याला पाणी दिले तरी हा गालिचा अत्यंत हिरवागार आणि टवटवीत राहतो.

 हा पर्यावरणाच्या दृष्टीने फायदेशीर तर आहेच तसेच शारीरिक दृष्ट्या ही याचे अनेक फायदे आहेत. या गालीच्या वर चप्पल न घालता चालले तर त्याचा आपल्या आरोग्यासाठी अत्यंत उपयोग होतो. या प्रकल्पामधून शेतकऱ्यांना तसेच तरुणांनाही उद्योग आणि व्यवसाय निर्मितीसाठी मदत होऊ शकेल यामधून स्थानिक तरुणांनाही रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणावर होणार आहे. काळ्या मातीत बरोबर समुद्रालगत असणाऱ्या खाऱ्या पाण्याच्या आणि कोकणातील लाल मातीतही अत्यंत चांगल्या प्रकारे वाढ होऊ शकते. ''कमी पावसाच्या तसेच जास्त पावसाच्या प्रदेशातही चांगल्या प्रमाणात वाढतो. पावसाचे प्रमाण अधिक असेल तरीही या गालिचामधून कोणत्याही प्रकारची दुर्गंधी येत नाही. नैसर्गिकरित्या तयार करण्यात आल्याने या गालिचामध्ये कोणत्याही विषारी सरपटणाऱ्या प्राण्यांचे वास्तव्य होऊ शकत नाही. त्यामुळे हा घरामध्ये आणि बागेमध्येही अतिशय संरक्षित दृष्ट्या वापरता येऊ शकतो. पुण्यासह केरळ मधील कोचीन आंद्र प्रदेश येथील हैदराबाद या ठिकाणीही मोठ्या प्रमाणावर या गालीचाची निर्मिती करण्यात येत आहे. त्यामुळेच केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशांमध्ये घरपोच हा गालिचा पर्यावरण प्रेमींपर्यंत पोहोचवण्याची सोयही करण्यात आल्याचे जिबॉय तांबी यांनी माहिती यांनी दिली.'' 

टॅग्स :Puneपुणेenvironmentपर्यावरणSocialसामाजिकIndiaभारत