शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

मुठा नदीमध्ये दररोज ६ टन केमिकल, सांडपाण्यावर प्रक्रियाच होईना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 3:44 AM

गटारातील सांडपाण्यात प्रामुख्याने घरगुती सांडपाण्याचे प्रमाण अधिक आहे. जगात कोणतेही तंत्रज्ञान नाही की, जे या कृत्रिम रसायनांचे जैविक विघटन करू शकेल.

- श्रीकिशन काळेपुणे - गटारातील सांडपाण्यात प्रामुख्याने घरगुती सांडपाण्याचे प्रमाण अधिक आहे. जगात कोणतेही तंत्रज्ञान नाही की, जे या कृत्रिम रसायनांचे जैविक विघटन करू शकेल. उलट ते करण्याच्या प्रयत्नांत अजून लाखो नवीन घातक रसायनांची निर्मिती होत आहे. शिवाय यातून निर्माण होणारा घनकचरा आपण कुठे टाकणार, हीसुद्धा मोठी समस्या आहे. दैनंदिन वापरातून पुणेकर दररोज सुमारे ६ टन रसायने सांडपाण्याद्वारे नदीत सोडत आहेत. परंतु, याकडे कोणाचेही लक्ष नाही. त्यामुळे मुठा नदीची गटारगंगाच बनली आहे.राष्टÑीय रासायनिक प्रयोगशाळेचे (एनसीएल) माजी शास्त्रज्ञ प्रमोद मोघे यांनी यावर संशोधन केले असून, त्यावर उपायदेखील सांगितले आहेत. या उपायाचे एक पुस्तक महापालिकेने तयार केले आहे. त्याबाबत जनजागृतीही केली जात आहे. परंतु, अनेक पुणेकर याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे दररोज सांडपाण्याद्वारे कितीतरी रसायने नदीमध्ये जात आहेत. महापालिकेकडून शंभर टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणाच नाही. त्यामुळे ही समस्या गंभीर होत आहे. ‘जायका’ प्रकल्पाद्वारे भविष्यात नदीसुधार योजना होऊ घातली आहे. त्यामुळे नदी कितपत स्वच्छ व सुंदर होईल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.कीटकनाशके, देवपूजा, गुटखा आदींमुळे आपण माणशी २० ग्रॅम रसायने, नदीत विसर्जित करतो. ज्यामध्ये धातू, तेलजन्य पदार्थ, कीटकनाशके, रंग, फॉस्फेट्स, कार्बोनेट्स, नायट्रेटसारखी घातक रसायने सामील आहेत. अशी ही जवळजवळ ६ टन रसायने जी पाण्यात अजिबात लवकर विघटित होऊ शकत नाहीत, अशी रसायने सांडपाण्यात लोटत असतो.उठल्या उठल्या दात घासले जातात. ब्रशवर कमीत कमी २ ते ५ ग्रॅम पेस्ट घेतली जाते. दात घासून फेसयुक्त पेस्ट बेसिनमध्ये थुंकून देतो. या पेस्टमध्ये मिठापासून ते फॉस्फेट कार्बोनेट्स, सुगंधी द्रव्ये, रंग, डिटर्जंन्ट्स इत्यादी तºहेतºहेची ६ रसायने तरी असतात. एका महानगराची लोकसंख्या साधारण ३४ लाख धरली, तर त्यापैकी ३० लाख लोक टुथपेस्ट वापरतात. ४ ग्रॅम = १२० लाख ग्रॅम रसायने आपण रोज विसर्जित करतो.उपाय : वैज्ञानिकदृष्ट्या असे सिद्ध झाले आहे की, नुसत्या ब्रशने जरी दात साफ केले तरी ते दातांना पूर्ण आरोग्यदायी आहे. याचा अर्थ टुथपेस्टचा वापर टाळू शकतो. पण एकदम ही सवय बदलणे अशक्य आहे. तेव्हा कमीत कमी अर्धा ग्रॅम टुथपेस्ट वापरून दात घासण्याची हळूहळू सवयीकरून नंतर आयुर्वेदिक दंतमंजने, नीम, बाभुळ यांच्या काड्या दात घासण्यासाठी वापरू शकतो. या गोष्टींचे जैविक विघटन लगेच होते. शास्त्रीय उपाय म्हणजे दात १ ते ३ टक्के प्रमाणित हायड्रोजन पेरॉक्साइडने (एम २ ओ २) घासल्यास कीड मरते, दांत पांढरेशुभ्र होतात शिवाय सांडपाण्यात त्याचे विघटन पाणी आणि आॅक्सिजनमध्ये होते.शहरातील पुरुषांची संख्या २० लाख धरली, तर त्यापैकी १५ लाख पुरुष रोज दाढीसाठी क्रीम, जेल, पेस्ट, साबण यांचा वापर करतात. आता दाढी प्रसाधनात फेसयुक्त रसायने, सल्फेट्स, कॉर्बोनेटस, स्टेअरिक अ‍ॅसिड, इथेनॉल अमिन इत्यादी ८ ते १० रसायने वापरली जातात. आपल्या हातावर किंवा दाढीवर ब्रशवर असे दाढी प्रसाधन ५ ते ८ ग्रॅम वापरले जाते. म्हणजे १५ लाख ७५ ग्रॅम (७५ लाख ग्रॅम) दाढी रसायने आपण सांडपाण्यात विसर्जित करतो.उपाय : शारीरिकदृष्ट्या गरम पाण्याने तोंड धुतल्यावर अथवा अंघोळ केल्यावर चेहऱ्यावरचे केस मऊ होतात. अशा वेळी वापरत असलेले ब्लेड्स आधुनिक असतील तर साबणाशिवाय सहज दाढी होऊ शकते. आपण कमीत कमी साबण फेस करण्यासाठी वापरला तर उत्तम. ज्यांना शक्य नसेल त्यांनी साबणाऐवजी लोण्याचा हात, कोरफडीचा गर चेहऱ्यावर फिरवून दाढी केल्यास साबणास तो पर्याय होऊ शकतो. त्यामुळे पाण्याचे होणारे प्रदूषण काही प्रमाणात कमी होऊ शकते.स्वयंपाकासाठी लागणारी भांडी रोजी धुतली जातात. त्यासाठी बहुतांशी सिलिका, कार्बोनेट्स, सोडियम संयुगे यांचा वापर भांडी धुण्याचा पावडरमध्ये केला जातो. माणशी कमीत कमी १० ते १५ ग्रॅम पावडरी वापर दिवसातील भांडी घासण्यासाठी केला जाते. तेव्हा ३० लाख रोज भांडी घासत असतील, तर ३० लाख ७ १० ग्रॅम = ३०० लाख ग्रॅम पावडर सांडपाण्याद्वारे जमिनीत जाते.उपाय : भांड्याचा ओशटपणा जाण्यासाठी नारळाच्या शेंड्या, शेणगोवऱ्यांची राख, माती हे पूर्वापार उपाय आपल्याला माहित आहेत. धातू भांडी चकचकीत करण्यासाठी चिंच, लिंबू साल, खाण्याचा सोडा आपण सहज वापरू शकतो. या गोष्टींमुळे सांडपाण्यातील सेंद्रिय पदार्थांचे जैविक विघटन सहज होते.रोजच्या रोज सकाळी व रात्री स्वयंपाक साधरण ३० लाख घरात होतो. यात सकाळी चहा-कॉफी-नाश्त्यापासून जेवण इत्यादी प्रकारात टॅनिन, कॅफिन, पॉली फिनाल्स, रंगद्रव्ये, अखाद्य तेल, फॅटी अ‍ॅसिड्स, मसाल्यातील रसायने, भाजी-पाल्यावरची कीटकनाशके आदींचा समावेश असतो. अशी २० ग्रॅम रसायने स्वयंपाकद्वारा सांडपाण्यात मिसळतात.उपाय :हे पाणी पुनर्वापरासाठी आपल्याला प्रक्रिया करून वापरात येऊ शकते.महानगरात ३० लाख नागरिक रोज अंघोळ करत असतील. अंघोळीसाठी साबणामध्ये खाद्य तेले, सुगंधी रसायने, रंग, सल्फेट्स, कार्बोनेट्स, सोडियम धातू, सेंद्रिय संयुगे, डिटर्जटस आदी रसायनांचा समावेश असतो. साधारणत: आपण रोज ४ ते ८ ग्रॅम साबण अंघोळीसाठी वापरतो. याचा अर्थ ३० लाख ७ ४ ग्रॅम = १२० लाख ग्रॅम रसायने आपण विसर्जित करतो. ५ लाख स्त्रिया/पुरुष रोज केस धुण्यासाठी शाम्पूचा वापर करतात. या शाम्पूत ६ ते १० रसायने असतात. साधारण ५ ग्रॅम शाम्पूचा प्रत्येक वापर केला जातो. ५ लाख ७५ ग्रॅम = २५ लाख ग्रॅम रसायने आपण पाण्यात विसर्जित करतो.उपाय : अंघोळीसाठी लागणाºया साबणाऐवजी आपण नैसर्गिक साधनांचा उपाय येथे सहज राबवू शकतो. बिनखर्चाचा पारंपरिक उपाय म्हणून अंग साफ करण्यासाठी प्युमिस स्टोन वापरू शकतो. (ज्वालामुखीपासून निर्मित दगड - हा दगड वडी स्वरूपात बाजारात मिळतो) सुगंधी उटणे वापरात येईल. शरीराला त्याच्या स्पर्शाने रंध्रे मोकळी झाल्याचे समाधान साबणाइतकेच मिळते. साबणाऐवजी शिकेकाई, उटणे, रिठा आदींचा वापर आपण पूर्वी पारंपरिकरित्या करत होतो तोच वापर आपण आता सहजरित्या करू शकतो. मुलांसाठी दुधसायीचा उपयोग, डाळीच्या पिठाचा उपयोग करता येऊ शकतो.अंघोळीनंतर कपडे धुणे हे ओघाने आलेच. धुण्याच्या साबणात, पावडरीत साधारणत: अखाद्य तेले, फॉस्फेटस, कार्बोनेट्स, रंग, द्रव्ये, वासद्रव्ये आदी असतात. डाग काढण्यासाठी अ‍ॅसिड, रसायनेही असू शकतात. साबणाचा वापर कमीत कमी माणशी १० ग्रॅम होतो. ३५ लाख लोक रोज कपडे धुतात, असे मानल्यास ३५ लाख ७१० ग्रॅम = ३५० लाख ग्रॅम रसायने पाण्यात जातात.उपाय : रिठा, शिकेकाई, व्हिनेगार याचा उपयोग वॉशिंग मशिनमध्ये किंवा हाताने धुण्यासाठी करून आपण नैसर्गिकरित्या कपडे स्वच्छ करू शकतो.जगात असे कोणतेही तंत्रज्ञान नाही की, जे कृत्रिम रसायनांचं जैविक विघटन करेल. उलट ते करण्याच्या प्रयत्नांत अजून लाखो नवीन घातक रसायनांची निर्मिती होत आहे. मी जी माहिती समोर आणली आहे. ते केंद्र, राज्य, महापालिका प्रशासन यांच्यापर्यंत पोचले आहे. त्यांच्याकडून योग्य ती प्रसिद्धी मिळत नाही. महापालिकेने ‘कृत्रिम रसायनविरहित पर्यावरणपूरक जीवनशैली’ ही पुस्तिका तयार केली आहे. ती शाळेत, महाविद्यालयात दिली जात आहे.- प्रमोद मोघे, निवृत्त शास्त्रज्ञ, राष्टÑीय रासायनिक प्रयोगशाळाफेस पावडर, तेल, नेल पॉलिश, अत्तरे, सुगंधी फवारे याचा वापर रोज होतो. अशा प्रसाधनांमध्ये जवळपास १८ रसायनांचा वापर केला जातो. ३० लाख लोक रोज ५ ग्रॅम सौंदर्यप्रसाधने वापरतात. ३० लाख ७५ ग्रॅम = १५० लाख ग्रॅम रसायने सांडपाण्यात जातात.उपाय : केसांसाठी शिकेकाई, रिठा, मसाला मेंदी, वाळा, सुगंधी आयुर्वेदिक तेल, फेसपॅकसाठी दही, हळद, डाळीचे पीठ, पपई, काकडी, केळीचा गर आदींचा वापर करता येतो. सध्या लिपस्टिकसुद्धा नैसर्गिक रंग वापरून तयार करतात. चेहरा उजळण्यासाठी साय, हळद, मधाचा उपयोग, वासासाठी पूर्वापार चालत आलेल्या अत्तरांचा उपयोग, केसांतील उवा प्रतिबंधासाठी सीताफळ बियांचे चुर्ण उपयुक्त ठरते.रोज या तिन्ही कामांसाठी प्रचंड प्रमाणात रसायने वापरली जातात. यासाठी निरनिराळ्या अ‍ॅसिड्स, कार्बोनेट्स, फिनाइलयुक्त रसायने असलेली पावडर, द्रव्ये वापरतो. त्याचाही वापर माणशी १० ग्रॅम होतोच. तेव्हा जवळपास ३५० लाख ग्रॅम रसायने सांडपाण्यात जातात.उपाय : व्हिनेगार (अ‍ॅसिटिक अ‍ॅसिड) या नैसर्गिक पदार्थाचे महत्त्व आहे. व्हिनेगर, लिंबूरस, खाण्याचा सोडा यांचे पाण्यातील मिश्रण आपण बाथरूम, सफाई, टॉयलेट, खिडकी काचा, स्वयंपाकघर ओटा पुसण्यासाठी वापरू शकतो.

टॅग्स :pollutionप्रदूषणWaterपाणीPuneपुणे