शहरं
Join us  
Trending Stories
1
"राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
2
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
3
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
4
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
5
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
6
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
7
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
8
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
9
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
10
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
11
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
12
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
13
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
14
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
15
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
16
"गिरीजा ओकला पाहून इम्रान हाश्मीही झालेला दंग", प्रसिद्ध निर्मातीने सांगितला 'तो' किस्सा
17
"गौतम अदानी हे माझ्या मोठ्या भावासारखे, ते हक्काने मला रागवतात"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या भावना
18
नव्या पर्वाला सुरुवात; मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, जागावाटपही ठरले!
19
वृद्धापकाळाची चिंता सोडा! एलआयसीच्या 'या' योजनेत एकदा गुंतवा आणि आयुष्यभर मिळवा पेन्शन
20
Malegaon Municipal Corporation Election : जमलं तर आघाडी; नाहीतर काँग्रेस स्वबळावर; एमआयएमबरोबर फिस्कटले, ९ उमेदवारांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीतून सावरतानाच पिकांना हवामानाचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2020 15:59 IST

शेतकरी पुन्हा संकटात...

ठळक मुद्देपिकांवर पुन्हा अस्मानी : कांद्यावर करपा, तर उसाला आले तुरे मागास कांद्याची वाढ खुंटून पिकांवर करपा, मावा व पीळ रोगांचा विपरीत परिणाम महागडी रासायनिक औषधांची फवारणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर  ढगाळ वातावरण पिकांच्या वाढीसाठी निश्चितच धोकादायकगेल्या दहा-बारा दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल

पुणे (शेलपिंपळगाव) : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले. यातून सावरत असतानाच गेल्या आठवड्याभरापासून असलेल्या ढगाळ हवामानामुळे पिकांवर करपा, बुरशी यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. पिके वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात महागडी औषधे फवारावी लागत आहे. यामुळे उत्पादनखर्च तरी मिळणार का? या विवंचनेत शेतकरी आहेत. गेल्या दहा-बारा दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल घडून आला आहे. ढगाळ हवामानामुळे रब्बी हंगामातील मागास कांदा, गहू, मका, कोबी, फ्लॉवर, फुलझाडे, पालेभाज्या, फळपिके तसेच महत्त्वाच्या तोडीव पिकांवर विशेषत: मिरची, गवार, वांगी, वालवर पिकांवर मावा व करपा रोगराईचे सावट पसरले आहे. चालू वर्षी खरीप व रब्बी या दोन्ही ही प्रमुख हंगामात शेतकºयांना दूषित हवामानाशी सामना करावा लागला. रब्बी हंगामातील सुरुवातीच्या आगाप कांदा पिकाला अगदी लागवडीपासूनच रासायनिक औषधांची फवारणी करावी लागली. परंतु आगाप कांदा पूर्णत्वास येण्याच्या कालवधीत हवामानाने साथ सोडल्याने पिकांना रोगराईने ग्रासले आहे. परिणामी कांदा उत्पादनात कमालीची घट घडून येत आहे. खेडच्या पूर्व तसेच शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात चासकमान कालव्याचे मुबलक पाणी उपलब्ध होत असल्याने बळीराजा खरीप व रब्बी या मुख्य दोन हंगामासह उन्हाळी हंगामात देखील विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत आहे. विशेषत: या हंगामात मागास कांदा, वाल, मका, फुलझाडे, बाजरी, पालेभाज्या, तोडीव पिके तसेच फळपिके पिकवण्याकडे शेतकरी आकर्षित झाला आहे. परंतु मागील काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल घडून आला आहे. रब्बीतील मागास कांद्याची वाढ खुंटून पिकांवर करपा, मावा व पीळ रोगांचा विपरीत परिणाम होऊ लागला आहे. आगाप कांदालागवडीला ज्या लहरी हवामानाने बाधित केले होते, त्याच प्रकारे मागास कांद्याच्याही संवर्धनासाठी महागडी रासायनिक औषधांची फवारणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर ओढवली आहे.......... रब्बी हंगामात हवामान बदलाचा प्रभाव आणि परिणाम जाणवत आहे. पुढील आठ दिवस थंडीतही चढ-उतार होणार आहे. गहू आणि कांदा पिकाला पाणी, खते आणि औषधांचे योग्य नियोजन केल्यास पीक यशस्वीपणे काढता येईल. तुरा आलेले ऊस पीक गाळपाला येणे योग्य राहील. - डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ.......... ढगाळ वातावरण पिकांच्या वाढीसाठी निश्चितच धोकादायक ठरत आहे. गेल्या दहा-बारा दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल घडून आल्याने पिकांवर रोगराई पसरू लागली आहे. आगाप कांद्याच्या उत्पादनात किमान ५० टक्के घट झाली आहे.- विलास मोहिते, शेतकरी मोहितेवाडी........खेडच्या पूर्व तसेच शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात मुबलक पाणी ही शेतकºयांसाठी जमेची बाजू ठरत आलेली आहे. चालू वर्षी सुरुवातीच्या आगाप कांद्याला चांगला बाजारभाव प्राप्त झाल्याने अनेक शेतकरी मागास कांद्याकडे आकर्षित झाले आहेत. सध्या प्रतीनुसार कांद्याला प्रतिकिलो ३५ ते ४० रु. भाव मिळत आहे. हवामानाची साथ मिळत नसल्याने मागास कांदालागवडी धोक्यात येऊ लागल्या आहेत.  दूषित हवामानामुळे मका, मागास गहू, फुलझाडे, पालेभाज्या, फळपिके, कोबी, फ्लॉवर आदी महत्त्वाच्या सर्वच पिकांवर करपा, मावा, पीळ, चिकटा, अळी आदी रोगांचा अधिक प्रादुर्भाव होऊ लागला आहे. या सोबतच जुन्नर तालुक्यातील द्राक्ष बागाही ढगाळ वातावरणमुळे संकटात आल्या आहेत. पुढील काही दिवस वातावरण असेच राहिल्यास ही पिके पूर्णत्वास येण्यास अडचण येणार असल्याचे उत्पादक शेतकºयांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेCrop Loanपीक कर्जCrop Insuranceपीक विमाGovernmentसरकारFarmerशेतकरीRainपाऊस