माळशेज घाटात खासगी बस पलटी होऊन भीषण अपघात; २ ठार तर १८ जखमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2021 13:58 IST2021-02-01T13:57:35+5:302021-02-01T13:58:09+5:30

नगरहून कल्याणकडे ही बस प्रवासी घेऊन निघाली होती.

Private bus overturns in Malshej Ghat; 2 death and 18 injured | माळशेज घाटात खासगी बस पलटी होऊन भीषण अपघात; २ ठार तर १८ जखमी 

माळशेज घाटात खासगी बस पलटी होऊन भीषण अपघात; २ ठार तर १८ जखमी 

जुन्नर : अहमदनगर - कल्याण महामार्गावर माळशेज घाटात रविवारी (दि. ३१) रात्री ८ च्या दरम्यान बस पलटी होऊन भीषण अपघाताची घटना घडली. नगरहून कल्याणकडे ही बस प्रवासी घेऊन निघाली होती. मात्र माळशेज घाटातील एका धोकादायक वळणावर बस पलटी होऊन हा अपघात घडला. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून १८ जण जखमी झाले आहे. 

माळशेज घाटात बस पलटी होऊन घडलेल्या अपघाताची माहिती समजताच पोलीस यंत्रणा, रुग्णवाहिका मदतीसाठी तत्परतेने घटनास्थळी दाखल झाल्या. या अपघातातील जखमींना उपचारासाठी आळेफाटा व मुरबाड येथील रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. 

गेल्या काही दिवसांपासून माळशेज घाटात सुरू असलेल्या दुरुस्तीचे विविध कामे सुरु आहे. त्यामुळे वाहन चालविताना चालकांना मोठी कसरत करावी लागते. यामुळे मागील काही दिवसात माळशेज घाटात अपघातांची संख्या वाढली आहे. 

Web Title: Private bus overturns in Malshej Ghat; 2 death and 18 injured