शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना अध्यक्षपदी पृथ्वीराज जाचक; उपाध्यक्षपदी कैलास गावडे बिनविरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 17:05 IST

संचालक मंडळाच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार व क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्या नेतृत्वाखालील श्री जय भवानी माता पॅनल सत्तेवर आले

बारामती: भवानीनगर (ता.इंदापुर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी पृथवीराज साहेबराव जाचक यांची तर उपाध्यक्षपदी कैलास रामचंद्र गावडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. बुधवारी (दि २८) अध्यक्ष,उपाध्यक्ष पदाची आज निवड प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांच्या उपस्थितीत पार पडली.

निवडीपुर्वी काटेवाडी येथील निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत नवनिर्वाचित संचालकांची बैठक झाली. त्यावेळी पवार यांनी नवनिर्वाचित संचालक मंडळासमवेत चर्चा करुन उपाध्यक्षांचे नाव सुचविले. त्यानंतर हे सर्व संचालक कारखान्यावर पोहोचले. यावेळी निवड प्रक्रियेदरम्यान जाचक आणि पाटील या दोघांचेच अर्ज दाखल झाले. यावेळी अध्यक्षपदासाठी जाचक यांना सुचक म्हणून अशोक पाटील यांनी, तर अनुमोदक म्हणुन अनिल काटे यांनी स्वाक्षरी केली. तर उपाध्यक्ष गावडे यांच्या अर्जावर सुचक म्हणुन अॅड शरद जामदार यांनी, अनुमोदक म्हणून पृथवीराज घोलप यांनी स्वाक्षरी केली. एकूण निवडप्रक्रियेनंतर अध्यक्षपदासाठी जाचक, तर उपाध्यक्ष पदासाठी गावडे यांच्या नावाची घोषणा निवडणुक निर्णय अधिकारी नावडकर यांनी घोषणा केली. यावेळी नुतन अध्यक्ष, उपाध्यक्षांचा नावडकर यांच्या हस्ते कारखान्याच्या वतीने सन्मान करण्यात आला. तर संचालक मंडळाचा देखील यावेळी कारखान्याच्या वतीने सत्कार करण्यात आला.

संचालक मंडळाच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार व क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्या नेतृत्वाखालील श्री जय भवानी माता पॅनल सत्तेवर आले. प्रचार सभेतच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पृथ्वीराज जाचक यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याचा पाच वर्ष कारभार चालणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार आज जाचक यांची अध्यक्षपदी अधिकृत निवड करण्यात आली.

निवडीनंतर नुतन अध्यक्ष जाचक म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रिडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह सभासद, कामगारांनी माझ्यावर विश्वास दाखवून या पदावर काम करण्याची संधी दिली. तुमचे आभार मानण्यास माझ्याकडे शब्द नाही. आपल्या अपेक्षा पुर्ण करण्याबरोबरच दिलेला शब्द पाळण्यासाठी आम्ही सर्वजण कटीबध्द आहोत. या छत्रपती कारखान्याचा नावलौकिक गतवैभव प्राप्त करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा करतो, असे जाचक म्हणाले.

भवानीनगर येथे निवडीपूर्वी पृथ्वीराज जाचक यांचे वडील, छत्रपती चे संस्थापक अध्यक्ष स्व. साहेबराव जाचक यांच्या जुन्या मारुती ८०० कारमधून पोहोचले. जाचक यांचे वडील कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आहेत. ही कार जाचक यांचे चिरंजीव कृुणाल जाचक यांनी अजून जपलेली आहे. या कारशी असलेल्या भावनिक नात्यामुळे त जाचक त्यांच्या वडीलांच्या कारमध्ये कारखान्यावर आले. यावेळी जाचक कारखाना कार्यालयाच्या प्रवेशद्वारवर डोक ठेवत नतमस्तक झाले.

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीSugar factoryसाखर कारखानेNCPराष्ट्रवादी काँग्रेसElectionनिवडणूक 2024SocialसामाजिकAjit Pawarअजित पवार