जामीन रद्द झाल्याने कैद्याची आत्महत्या ; येरवडा कारागृहातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2019 16:41 IST2019-10-09T16:40:42+5:302019-10-09T16:41:39+5:30
हाफ मर्डच्या गुन्ह्यात आराेपी असलेल्या एका कैद्याने येरवडा कारागृहात नैराश्यातून आत्महत्या केली आहे.

जामीन रद्द झाल्याने कैद्याची आत्महत्या ; येरवडा कारागृहातील घटना
पुणे : हाफ मर्डरच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आराेपीचा जामीन नामंजुर झाल्याने नैराश्यातून कैद्याने आत्महत्या केल्याची घटना येरवडा मध्यवर्ती कारागृहात मंगळवारी घडली आहे. सिद्धार्थ कांबळे ( वय 30 ) असे आत्महत्या केलेल्या कैद्याचे नाव असून इंदापूर येथील घटनेत त्याला अटक करण्यात आली हाेती.
कारागृह प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार सिद्धार्थ हा जून 2019 पासून येरवडा कारागृहात हाेता. इंदापूर येथील एका हाफ मर्डरच्या गुन्ह्यात त्याला काेठडी सुनावण्यात आली हाेती. त्याच्या जामीनावर सुनावणी सुरु हाेती. या खटल्यात न्यायालयाने त्याचा जामीन नाकारला हाेता. त्यामुळे नैराश्य आल्याने आराेपीने अंतर्वस्त्राच्या इलास्टिकच्या सहाय्याने गळा आवळून घेत आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. ही घटना समाेर येताच कारागृह प्रशासनाने मृतदेह शवविच्छेदनाला पाठवला. त्यानंतर त्याच्या नातेवाईकांकडे सुपूर्त करण्यात आला.
या घटनेबाबत येरवडा कारागृहाचे अधिक्षक यु. टी. पवार म्हणाले, काल दुपारच्या सुमारास आराेपीने गळफास घेऊन आत्महत्या केली. न्यायालयात त्याच्यावर खटला सुरु हाेता. न्यायालयाने जामीन नाकारल्याने नैराश्यातून कैद्याने टाेकाचे पाऊल उचलेले. कैद्याच्या मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला आहे.