कैद्याच्या डोक्यात मारली विट :येरवडा जेलमध्ये कैद्यामध्ये हाणामारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2019 20:10 IST2019-01-19T20:08:13+5:302019-01-19T20:10:58+5:30
येरवडा जेल मध्ये जुन्या वादातून एका कैद्याने दोन कैद्यानां मारहाण केल्याचा प्रकार शुक्रवारी दुपारी घडला.

कैद्याच्या डोक्यात मारली विट :येरवडा जेलमध्ये कैद्यामध्ये हाणामारी
विमान नगर :येरवडा जेलमध्ये जुन्या वादातून एका कैद्याने दोन कैद्यानां मारहाण केल्याचा प्रकार शुक्रवारी दुपारी घडला. या प्रकरणी काराग्रुह विभागाचे शिपाई राहुल भोसले यांनी येरवडा पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
येरवडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ,शुक्रवारी दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास सागर बाबू जावळे या कैद्याला अजय राजाराम हिंगे व आकाश दिपक लोखंडे या दोन कैदयांनी शिवीगाळ करुन डोक्यात वीट मारुन जखमी केले. काराग्रुह विभागाच्या तक्रारीवरून मारहाण करणार्या दोन कैद्यांविरुध्द येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
(उर्वरित माहिती लवकरच )