शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

नामांकित कंपनीचा लोगो वापरून बनावट मालाची विक्री करणाऱ्या दुकानावर छापा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 10:09 IST

- ८ लाख २ हजार ६०० रुपयांचा बनावट माल जप्त

पुणे : नामांकित कंपनीचा लोगो वापरून बनावट बॅग, टी-शर्ट, स्पोर्ट्स शूज, चप्पल, जाकीट, ट्राउझर, बॉक्सर पॅन्टची विक्री करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकून ८ लाख रुपयांचा बनावट माल जप्त केला आहे. स्टाइलॉक्स फॅशन हब (लिपाणे वस्ती, आंबेगाव बुद्रुक, कात्रज) या दुकान मालकावर आंबेगाव पोलिस ठाण्यात कॉपीराइट ॲक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुणे शहरात वेगवेगळ्या ठिकाणी ब्रॅण्डेड कंपनीच्या बनावट मालाची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी कारवाई करण्याचे आदेश गुन्हे शाखेच्या युनिट-२ चे पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांना दिले होते. पुमा कंपनीच्या अधिकृत प्रतिनिधीमार्फत शहरात शोधमोहीम सुरू होती. आंबेगाव बुद्रुक येथील स्टाइलॉक्स फॅशन हब या दुकानात बनावट मालाची विक्री होत असल्याची माहिती मिळाली. दुकानात मोठ्या प्रमाणावर पुमा या ब्रॅण्डेड कंपनीचा लोगो वापरून बॅग, टी-शर्ट, स्पोर्ट्स शूज, चप्पल, जाकीट, ट्राउझर्स आणि बॉक्सर पॅन्टची विक्री सुरू होती. तेथून ८ लाख २ हजार ६०० रुपयांचा बनावट माल जप्त करण्यात आला आहे.ही कारवाई सहायक पोलिस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रताप मानकर, सहायक पोलिस निरीक्षक अमोल रसाळ, पोलिस उपनिरीक्षक नितीन कांबळे, पोलिस अंमलदार शंकर नेवसे, अमोल सरडे, ओमकार कुंभार, संजय आबनावे, विनोद चव्हाण, साधना ताम्हाणे, विजय पवार, प्रमोद कोकणे, निखिल जाधव, गणेश थोरात आणि नागनाथ राख यांनी केली.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालयMaharashtraमहाराष्ट्रPoliceपोलिस