पंतप्रधानांचे बंधू अमृत मोदी यांनी घेतले भीमाशंकराचे दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 01:14 IST2019-03-19T01:14:03+5:302019-03-19T01:14:15+5:30

श्रीक्षेत्र भीमाशंकर दर्शनासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे थोरले बंधू अमृतभाई दामोदरदास मोदी आले होते. त्यांच्या समवेत त्यांची मुलगी व परिवार होता.

 Prime Minister's brother Amrit Modi took a dignified view of Bhimashankar | पंतप्रधानांचे बंधू अमृत मोदी यांनी घेतले भीमाशंकराचे दर्शन

पंतप्रधानांचे बंधू अमृत मोदी यांनी घेतले भीमाशंकराचे दर्शन

भीमाशंकर - श्रीक्षेत्र भीमाशंकर दर्शनासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे थोरले बंधू अमृतभाई दामोदरदास मोदी आले होते. त्यांच्या समवेत त्यांची मुलगी व परिवार होता.
दर्शन झाल्यानंतर देवस्थानच्या वतीने पुरुषोत्तम गवांदे, आशिष कोडिलकर, राहुल कोडिलकर, दत्तात्रय कौदरे, जालिंदर कौदरे इत्यादींनी त्यांचे स्वागत आणि सत्कार केला. भीमाशंकर दर्शन करून परत येत असताना घोडेगाव येथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
घोडेगावच्या तिळवण तेली समाजाच्या वतीने शनिमंदिरात त्यांचा सत्कार करण्यात आला. समाजाचे अध्यक्ष रवींद्र कर्पे, वासुदेव कर्पे इत्यादींनी सत्कार केला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य देविदास दरेकर, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य भानुदासनाना काळे, संजय नांगरे, राजेश काळे, विजय कर्पे, सुधाकरभाऊ चिलेकर, अजित चिलेकर, विनायक कर्पे, संतोष करडिले, नीलेश चिलेकर, भगवानशेठ भागवत इत्यादी उपस्थित होते.

Web Title:  Prime Minister's brother Amrit Modi took a dignified view of Bhimashankar

टॅग्स :Puneपुणे