अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा ठरला; मेट्रोच्या उद्घाटनानंतर महापालिकेत कार्यक्रम
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2022 13:06 IST2022-02-19T13:05:03+5:302022-02-19T13:06:45+5:30
पुढील महिन्यात पंतप्रधान मोदी पुण्याच्या दौऱ्यावर

अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा ठरला; मेट्रोच्या उद्घाटनानंतर महापालिकेत कार्यक्रम
पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) 6 मार्च रोजी पुणे दौऱ्यावर असणार आहेत. पुणे शहरातील गरवारे या मेट्रोच्या स्टेशनचं उद्घाटन याप्रसंगी होणार आहे. तसेच पुणे महानगरपालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
याआधीही नरेंद्र मोदीचा पुणे दौरा नियोजित होता, परंतु काही कारणास्तव तो रद्द करण्यात आला होता. त्यानंतर आता पुणे महानगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. महापालिका निवडणूकीच्या तोंडावर पंतप्रधान मोदींचा दौरा भाजपसाठी महत्त्वाचा मानला जात आहे.