शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

प्राथमिक शिक्षकांच्या समायोजन बदल्या यंदाही रद्द

By admin | Updated: May 19, 2015 23:55 IST

गेल्या दोन वर्षांपासून राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या समायोजन बदल्या वेळेत झाल्या नाहीत. दर वर्षी मे महिन्यात होणाऱ्या शिक्षकांच्या बदल्या या वर्षीही रद्द झाल्या आहेत.

बारामती : गेल्या दोन वर्षांपासून राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या समायोजन बदल्या वेळेत झाल्या नाहीत. दर वर्षी मे महिन्यात होणाऱ्या शिक्षकांच्या बदल्या या वर्षीही रद्द झाल्या आहेत. नुकताच ग्रामविकास खात्याने हा निर्णय घेतला आहे. यामुळे शिक्षकवर्गात मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे.कक्ष अधिकारी संजय कुडवे यांनी सर्व जिल्हा परिषदांना हा शासननिर्णय पाठविला आहे. अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन बदल्यांना न्यायालयाकडून स्थिगिती देण्यात आली आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षक संचालकांनी यावर्षी बदली करण्याबाबत ग्रामविकास खात्याकडे मार्गदर्शन मागितले होते. शालेय शिक्षण विभागाकडून आरटीई अ‍ॅक्टअंतर्गत पटनिश्चिती, पदनिश्चितीची कार्यवाही पूर्ण झाली नाही. या सर्व गोष्टींना न्यायालयाचा स्थगिती आदेश आहे. त्यामुळे फक्त ‘आपसी बदल्यां’ना परवानगी देण्यात येत आहे. इतर कोणत्याही प्रशासकीय बदल्या, विनंती बदल्या, आंतरजिल्हा बदल्या करण्यात येणार नाहीत, असे शासननिर्णयात नमूद करण्यात आले आहे.अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन, मुख्याध्यापक पदोन्नती, पदवीधर शिक्षक पदोन्नती आदी प्रक्रि या होऊ शकली नाही. सद्यस्थितीत आपसी बदली वगळता इतर बदल्या करणे अडचणीचे होत असल्याची सर्व जिल्ह्यांत परिस्थिती आहे, असे या निर्णयात नमूद करण्यात आले आहे. यामुळे शिक्षकवर्गात असंतोष असल्याचे पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीचे अध्यक्ष नंदकुमार होळकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. मागील तीन वर्षांपासून तालुकांतर्गत विनंती बदल्या रिक्त जागा नसल्याने होत नाहीत. सेवा खंडित करण्यासाठी, गैरसोयीच्या ठिकाणी काम करणाऱ्या शिक्षकांना सोयीच्या ठिकाणी काम करण्यासाठी तालुकातंर्गत विनंती, आपसी, प्रशासकीय बदल्यांची आवश्यकता होती. मात्र, यंदाही मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही बदल्या रद्द झाल्याने शिक्षकांनी मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त केली आहे.या संदर्भात शासन लवकरच नवीन धोरण जाहीर क रणार आहे. या वेळी मागण्या प्रभावीपणे मांडल्या जातील, असे होळकर यांनी सांगितले.समायोजन बदल्यांच्या कारणावरून गेल्या वर्षापासून शिक्षकांच्या बदल्या रद्द होत आहेत, ही गंभीर व दुर्दैवी बाब आहे. मागील तीन वर्षांपासून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये रिक्त जागा नसल्याने तालुकांतर्गत विनंती बदल्या होत नाहीत. या बदल्यांबरोबरच आपसी व प्रशासकीय बदल्या करण्यात याव्यात अशी बहुतांशी शिक्षकांची मागणी आहे. - नंदकुमार होळकर ,जिल्हाध्यक्ष, प्राथमिक शिक्षक समिती आपसी बदल्यांव्यक्तिरिक्त इतर झालेल्या बदल्या स्थगित करण्यात आल्या आहेत. न्यायालयाचा निर्णय हा सर्वांवर बंधनकारक असतो. या संदर्भात आरटीईच्या नियमांनुसार लवकरात लवकर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र यावर शिक्षकांच्या सर्व संघटनांनी एकच समान उपाय शोधला तर यावर सामोपचाराने निर्णय घेता येईल.- सत्यजित बडेउपमुख्य कार्यकारी अधिकारी पुणे जिल्हा परिषद,