शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात हिंदू महिलेवर धर्मांतराचा दबाव? ‘लव्ह जिहाद’चा गंभीर आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 14:20 IST

३२ वर्षीय हिंदू विधवेवर मुस्लिम व्यक्तीने जबरदस्तीने धर्मांतराचा दबाव टाकल्याचा आरोप

- अश्विनी जाधव केदारीपुणे: पुणे शहर आणि जिल्ह्यात 'लव्ह जिहाद'च्या घटनांमध्ये मोठी वाढ होत असल्याचा आरोप भाजप नेत्या मंजुषा नागपुरे आणि भाजप पुणे शहर महासचिव दीपक नागपुरे यांनी केला आहे. नुकत्याच उघडकीस आलेल्या एका प्रकरणात ३२ वर्षीय हिंदू विधवेवर मुस्लिम व्यक्तीने जबरदस्तीने धर्मांतराचा दबाव टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे.३२ लाखांची फसवणूक सिंहगड रस्ता परिसरातील एका महिलेच्या पतीच्या निधनानंतर आरोपी अकबर बहादूर शेख याने तिचा विश्वास संपादन करत जवळीक साधली. त्यानंतर, तिच्या भविष्यनिर्वाह निधीतील आणि सोन्याच्या दागिन्यांसह एकूण ३२ लाख रुपये हडपल्याचा आरोप आहे. महिलेने जबरदस्तीने इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडल्याचा गंभीर दावा केला आहे.लव्ह जिहाद’च्या घटनांमध्ये वाढ – नागपुरे'या घटनेबाबत माहिती देताना मंजुषा नागपुरे म्हणाल्या,'या प्रकरणात आरोपीने महिलेच्या मनात सहानुभूती निर्माण करून तिच्या जवळीक साधली. मात्र, त्याच्या इतर फसवणुकीच्या घटना समजल्यानंतर महिलेची फसवणूक झाल्याचे उघड झाले. अशा प्रकारचे अनेक प्रकार समोर येत आहेत, त्यामुळे फसवणूक झालेल्या महिलांनी न घाबरता पुढे यावे आणि कायदेशीर मार्गाने आरोपींना धडा शिकवावा.'५० हून अधिक महिलांची फसवणूक?भाजप पुणे शहर महासचिव दीपक नागपुरे यांनी दावा केला की,'गेल्या वर्षभरात पुणे शहर आणि जिल्ह्यात अशा ५० हून अधिक घटनांच्या तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. मात्र, अनेक महिला भीतीपोटी किंवा समाजाच्या दबावामुळे तक्रार करत नाहीत. परिणामी, अनेक घटना समोरच येत नाहीत.'‘मॅट्रिमोनियल साइट्स आणि सूचक मंडळांची पडताळणी आवश्यक’याच मुद्द्यावर बोलताना नागपुरे यांनी मॅट्रिमोनियल साईट्स आणि वधू-वर सूचक मंडळांवरही संशय व्यक्त केला. काही परधर्मीय पुरुष बनावट कागदपत्रांच्या आधारे खोटी माहिती देत महिलांची फसवणूक करत आहेत. त्यामुळे अशा प्लॅटफॉर्म चालवणाऱ्या कंपन्यांनी योग्य पडताळणी करावी, अन्यथा त्यांनाही ‘लव्ह जिहाद’ प्रकरणात सहआरोपी करण्याची मागणी केली जाईल.' असे नागपुरे म्हणाले.महिलांना पुढे येण्याचे आवाहननागपुरे आणि मंजुषा नागपुरे यांनी पीडित महिलांना धैर्याने पुढे येऊन तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, या प्रकरणात सरकारने तातडीने लक्ष घालावे आणि फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकWomenमहिलाLove Jihadलव्ह जिहादpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्र