शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

बैठकांचे ध्वनिचित्रमुद्रण सादर करा

By admin | Updated: May 16, 2017 07:04 IST

शाळेची शुल्कवाढ पालक शिक्षक संघाच्या संमतीने करणे अपेक्षित आहे. त्यानुसार शुल्क निश्चित करण्यासाठी पालक शिक्षक संघाचे प्रतिनिधी

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : शाळेची शुल्कवाढ पालक शिक्षक संघाच्या संमतीने करणे अपेक्षित आहे. त्यानुसार शुल्क निश्चित करण्यासाठी पालक शिक्षक संघाचे प्रतिनिधी आणि व्यवस्थापनाचे प्रतिनिधी यांच्या बैठकीचे ध्वनिचित्रण करणे कायद्याने बंधनकारक आहे. त्यानुसार शुल्कवाढ करण्यापूर्वी पालक शिक्षक संघाची संमती घेतल्याचे ध्वनिचित्रमुद्रण शाळांनी सादर करावे, असे आदेश शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी दिले. बहुतांश शाळा पालक-शिक्षक संघाची संमती घेत नाहीत, तसेच बैठकांचे ध्वनिचित्रमुद्रणही केले जात नाही. त्यामुळे त्या अडचणीत येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. विनोद तावडे मागील आठवड्यात फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये आले होते, त्या वेळी शुल्कवाढीच्या प्रश्नावरून पालकांनी तावडे यांना घेराव घातला होता. या प्रश्नावर सोमवारी मुंबईत सुनावणी घेऊ, असे तावडे यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार शुल्कवाढीच्या तक्रारी आलेल्या १८ शाळांपैकी विबग्योर स्कूल, इंदिरा नॅशनल स्कूल, युरो स्कूल, सिंहगड स्प्रिंगडल स्कूल, महर्षी कर्वे शिक्षण संस्था, इमॅन्युअल मारथोमा इंग्लिश मीडियम स्कूल ६ शाळांचे व्यवस्थापन आणि पालक प्रतिनिधी यांची एकत्रित बैठक पार पडली.शिक्षणमंत्र्यांसह शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वत: लक्ष घालूनही शाळांच्या बेकायदेशीर शुल्कवाढीचा प्रश्न प्रलंबितच आहे. शिक्षण विभागाच्या आदेशांना शाळा जुमानत नसल्याने हा प्रश्न आणखी जटिल झाला आहे. सोमवारी शुल्कवाढीच्या प्रश्नावर शिक्षणमंत्र्यानी घेतलेल्या बैठकीतही यावर ठोस तोडगा निघू न शकल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली.