पुणे विभागाला अतिवृष्टीचा मोठा फटका; 87 हजार 416 हेक्टर पिकांच्या नुकसानीचा अंदाज 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2020 09:19 PM2020-10-16T21:19:30+5:302020-10-16T21:36:10+5:30

तब्बल 40 हजार लोकांना विभागात करावे लागले स्थलांतरीत 

Preliminary estimate of loss of 87 thousand 416 hectares of crops due to excess rainfall in Pune division | पुणे विभागाला अतिवृष्टीचा मोठा फटका; 87 हजार 416 हेक्टर पिकांच्या नुकसानीचा अंदाज 

पुणे विभागाला अतिवृष्टीचा मोठा फटका; 87 हजार 416 हेक्टर पिकांच्या नुकसानीचा अंदाज 

Next
ठळक मुद्दे8 व्यक्ती दगावल्या, 31 हजार घरांची पडझड,  1021 जनावरे मयत

पुणेपुणे विभागात बुधवार (दि.14) रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे तब्बल 87 हजार 416 हेक्टर वरील शेत पिकांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज समोर आला आहे. यामध्ये सर्वाधिक 58 हजार पेक्षा अधिक क्षेत्र एकट्या सोलापूर जिल्ह्यातील तर पुणे जिल्ह्यात 18 हजार 746 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. याशिवाय 8 व्यक्ती मयत झाल्या असून,  तब्बल 1 हजार 21 जनावरे पाण्यात वाहून गेली आहेत. या अतिवृष्टीमुळे घरांचे मोठे नुकसान झाले असून,  तब्बल 3 हजार 156 घरांची पडझड झाली असून,  100 झोपड्या देखील पडल्या आहेत. 

राज्यासह पुणे विभागात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. याचा फार मोठा फटका पुणे विभागातील सोलापूर, पुणे, सातारा आणि सांगली जिल्ह्याला बसला आहे. बुधवारी (दि 14) रोजी विभागात मुसळधार पाऊस झाला. यात तब्बल 16 तालुक्यात एका दिवसात शंभर मि.मी पेक्षा अधिक पाऊस झाला. तर पावसाचे पाणी घरांमध्ये शिरल्याने 40 हजार 36 लोकांना स्थलांतरीत करावे लागले. या पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील 4, सांगली जिल्ह्यात 3 आणि पुणे जिल्ह्यात एक व्यक्ती मयत झाली. जीवत हानी सोबतच जनावरांना देखील पावसाचा फटका बसला आहे. यात सोलापूर जिल्ह्यात 829 व पुणे जिल्ह्यात 153 जनावरे वाहून गेली आहेत. 
---- 
अतिवृष्टीमुळे पुणे विभागात झालेल्या नुकसानीची जिल्हानिहाय माहिती 
जिल्हा       हेक्टर क्षेत्र       घरांची पडझड     मयत जनावरे 
पुणे           18,746            265                    153
सातारा        1,420            267                    11
सांगली        8,276            365                     28
सोलापूर       58,581          2,256               829
कोल्हापूर     393               03                     0
एकूण         87146           3156                 1029

Web Title: Preliminary estimate of loss of 87 thousand 416 hectares of crops due to excess rainfall in Pune division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.