'मुख्यमंत्री म्हणतात पंचनामे करा तर मंत्री म्हणतात करू नका'
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2021 13:36 IST2021-09-30T13:19:27+5:302021-09-30T13:36:59+5:30
या कार्यक्रमादरम्यान दरेकर म्हणाले, सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा, वराती मागे घोडे नाचून उपयोग नाही. मराठवाडा उद्धवस्त झाला आहे, अशावेळी तात्काळ मदत देणे गरजेचे आहे

'मुख्यमंत्री म्हणतात पंचनामे करा तर मंत्री म्हणतात करू नका'
पुणे: मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून बळीराजामध्ये आक्रोश दिसून येत आहे. शेतकऱ्यांना अजून कोणतीही मदत जाहीर करण्यात आलेली नाही. मुख्यमंत्री म्हणतात पंचनामे करा तर मंत्री म्हणतात करू नका, असं वक्तव्य विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते प्रविण दरेकर (bjp pravin darekar) यांनी पुण्यात व्यक्त केलं.
पुढे बोलताना दरेकर म्हणाले, सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा, वराती मागे घोडे नाचून उपयोग नाही. मराठवाडा उद्धवस्त झाला आहे, अशावेळी तात्काळ मदत देणे गरजेचे आहे. एका बाजूला शेतकरी संकटात असताना सरकारमधील लोकांकडून जंगी स्वागताचे कार्यक्रम म्हणजे मीठ चोळण्याचे काम सुरू आहे. महाविकास आघाडीची काही झालं की केंद्रावर ढकलायचं ही ठरलेली भूमिका आहे, असा टोलाही दरेकर यांनी लगावला.
TET Exam: 'टीईटी’ परीक्षेच्या ताखेत पुन्हा बदल
केंद्राने सर्व संकटात राज्याला मदत केली आहे. अजूनही आम्ही मदतीची मागणी करू. राज्य सरकारला आपल्या जबाबदारीपासून पळता येणार नाही. केंद्र त्यांची जबाबदारी निभावेल, केंद्राकडे बोट दाखवण्याचे राजकारण बंद करा आणि तात्काळ मदत करा. देवेंद्र फडणवीस यांनी कालच केंद्रीय कृषिमंत्री यांच्याशी चर्चा केली आहे. नवाब मलिक किंवा संजय राऊत यांचं बोलणं लोक गांभीर्याने घेत नाहीत, असंही दरेकर यांनी सांगितले. पूर भागाच्या पाहणीकरता विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व मी दोन दिवसांनी मराठवाड्याचा दौरा करणार आहोत, ही माहितीही दरेकर यांनी दिली.