शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

राज्य सहकारी संघाच्या अध्यक्षपदी प्रताप पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 4:45 PM

गेल्या महिन्यात मतदानादिवशी झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर पुणे रेल्वे स्थानकाजवळील राज्य सहकारी संघाच्या कार्यालयाबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

ठळक मुद्देबिनविरोध निवड : उपाध्यक्षपदी सिद्धार्थ पथाडे, सचिवपदी विद्या पाटील

पुणे : महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या मतदानात झालेल्या गोंधळानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस- कॉंग्रेस आणि भाजप पुरस्कृत उमेदवारांनी मंगळवारी (दि. १०) सामंजस्याची भूमिका घेतली. राष्ट्रवादी कॉंगेसचे प्रताप पाटील (सांगली) यांची अध्यक्षपदी, तर आरपीआयच्या सिद्धार्थ पथाडे (चंद्रपूर) यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. कॉंग्रेसच्या विद्या पाटील या मानदसचिव पदी ३ मतांनी निवडून आल्या. गेल्या महिन्यात मतदानादिवशी झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर पुणे रेल्वे स्थानकाजवळील राज्य सहकारी संघाच्या कार्यालयाबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. निवडणुकीत विजयी झालेल्या २१ संचालकांनाच मतदान कक्षात सोडण्यात आले. तसेच, मतदान केंद्रात देखील टेबल-खुर्च्यांऐवजी गाद्या ठेवण्यात आल्या होत्या. गोंधळानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपापल्या समर्थकांना सामंजस्याने निवडणूक घेण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या प्रताप पाटील यांची निवड करण्यात आली. गेल्या चाळीस वर्षांत प्रथमच सांगली-कोल्हापुर भागाला अध्यक्षपदाचा मान मिळाला आहे. पाटील यांनी या पुर्वी सहकारी संघाच्या उपाध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे. कोल्हापुरच्या शिवाजी विद्यापीठामध्ये विद्या परिषद, तसेच अधिसभेवरही त्यांची निवड झाली आहे. मानद सचिव पदाच्या निवडणुकीत कॉंग्रेसच्या विद्या पाटील (लातूर) यांनी हिरामण सातकर (पुणे) यांचा १२ विरुद्ध ९ अशा फरकाने पराभव केला. जिल्हा उपनिबंधक आनंद कटके यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.  पोलीस महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या निवडणूकीत भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांच्या सहकार पॅनेलचा कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत संजीव कुसाळकर पॅनेलने पराभव केला होता. गेल्या महिन्यात १९ मार्चला निवडून आलेल्या २१ संचालकांमधून पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येणार होती. मतदानादिवशी आमदार दरेकर यांच्या समर्थकांनी आपल्याकडे १३ सदस्य असल्याचा दावा केला होता. तर कुसाळकर समर्थकांनी आपलेच बहुमत असल्याचे सांगितले होते. त्यावेळी झालेल्या वादात मतदान कक्षातील टेबल-खुर्च्या उधळून लावण्यात आल्या होत्या. कॉंग्रेस-राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेलचे अमोल घुले यांनी पिस्तुल दाखविल्याचा आरोप दरेकर समर्थकांनी केला होता. या प्रकरणी घुले यांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा देखील दाखल आहे. 

टॅग्स :PuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSharad Pawarशरद पवार