महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक १० एप्रिलला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 06:43 PM2018-04-04T18:43:26+5:302018-04-04T18:43:26+5:30

मतदानाच्या दिवशी दोन गटात झालेल्या राड्यानंतर पुढे ढकललेली महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक येत्या मंगळवारी (दि. १०) होणार आहे.

Election of Maharashtra State Co-operative sangh president on 10th April | महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक १० एप्रिलला

महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक १० एप्रिलला

Next
ठळक मुद्देमतदानाच्या दिवशी गोंधळामुळे पुढे ढकलले होते मतदान

पुणे : मतदानाच्या दिवशी दोन गटात झालेल्या राड्यानंतर पुढे ढकललेली महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक येत्या मंगळवारी (दि. १०) होणार आहे. पुणे स्टेशनजवळच्या सहकारी संघ सभागृहात दुपारी बारा वाजता मतदान होणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक आनंद कटके यांनी दिली.   
 सहकार जगताचे लक्ष वेधलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या पंचवर्षिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रवीण दरेकर यांच्या सहकार पॅनेलला कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीच्या संजीव कुसाळकर यांच्या परिवर्तन पॅनलने पराभूत केले होते. त्यानंतर गेल्या महिन्यात १९ तारखेला राज्य सहकारी संघाच्या अध्यक्षपद, उपाध्यक्ष आणि सचिव पदासाठी मतदान होते. त्यासाठी नवनिर्वाचित २१ सदस्य आले होते. त्यातील १० सदस्यांनी भाजप पुरस्कृत पॅनेलच्या बाजुने होते. तर ११ सदस्यांचा आघाडी पुरस्कृत कुसाळकर पॅनलला पाठिंबा होता. 
त्यावेळी मतदानाची कार्यक्रमपत्रिका मिळाली नसल्याचे कारण सांगत भाजप पुरस्कृत सदस्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तसेच, मतदान कक्षातील टेबल-खुर्च्या भिरकावून दिल्या. या गोंधळाचा व्हिडिओ प्रसारीत झाला होता. त्यात भाजप पुरस्कृत पॅनलचे भिकाजी पार्ले टेबल उधळून देताना दिसत आहेत. भाजप पुरस्कृत उमेदवारांनी अमोल घुले यांनी मतदानावेळी बंदुक रोखून धमकी दिल्याचे सांगितले. या प्रकरणी घुले यांच्या विरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे. 

..................................

निवडणुकीत झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर मतदानाच्या दिवशी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येईल. तसेच, निवडणुकीशी संबंधित व्यक्तींनाच मदतान केंद्राच्या आवारात सोडले जाईल.
- आनंद कटके, जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी 

Web Title: Election of Maharashtra State Co-operative sangh president on 10th April

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे