शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
2
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
3
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
4
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
5
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
6
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान
8
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
9
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
10
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
11
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
12
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
13
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
14
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
15
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
16
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
17
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
18
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
19
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
20
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

छत्रपती साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी प्रशांत काटे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 4:17 PM

प्रदिप निंबाळकर यांची श्री छत्रपती साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अवघ्या पाच दिवसांत वैयक्तिक कारणास्तव बंदुकीतून गोळी झाडून घेत आत्महत्या केली होती.

ठळक मुद्देअनुभवी व्यक्तीच्या हातात कारखान्याचा कारभार दिला जाणार, ही शक्यता ठरली खरी

बारामती : भवानीनगर येथील श्री छत्रपती साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा प्रशांत काटे यांना संधी मिळाली आहे. तर उपाध्यक्षपदी लासुर्णे (ता. इंदापूर) येथील अमोल पाटील यांची निवड केली आहे. आॅक्टोबर महिन्यात अमरसिंह घोलप यांनी राजीनामा दिल्याने प्रदिप निंबाळकर यांची आॅक्टोबर अखेरीस अध्यक्षपदावर निवड करण्यात आली होती. मात्र, निंबाळकर यांनी निवड झाल्यानंतर अवघ्या पाच दिवसांत वैयक्तिक कारणास्तव बंदुकीतून गोळी झाडून घेत आत्महत्या केली होती. तसेच यापूर्वीचे उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी देखील राजीनामा दिला होता. त्यामुळे मंगळवारी (दि.११) अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवड प्रक्रिया पार पडली. निवडणूक प्रक्रियेपूर्वी पक्ष निरीक्षक म्हणून राष्ट्रवादीचे किरण गुजर यांनी अजित पवार यांच्या सुचनेनुसार अध्यक्षपदासाठी काटे आणि उपाध्यक्षपदासाठी पाटील यांच्या नावाचा लखोटा आणला होता. त्यानुसार दोन्ही पदाच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. कारखान्यावर असणारे कोट्यावधीचे कर्ज, यंदाच्या हंगामात जाणवणारी उसाची टंचाई यातून मार्ग काढण्यासाठी अनुभवी व्यक्तीच्या हातात कारखान्याचा कारभार दिला जाणार, अशी शक्यता मागील काही दिवसांपासून वर्तविण्यात येत होती. त्याप्रमाणे प्रशांत काटे यांची निवड झाली आहे. काटे यांनी यापूर्वी देखील कारखान्याचा कारभार यशस्वीपणे सांभाळला आहे. लासुर्णे येथील अमोल पाटील यांना उपाध्यक्षपदी संधी दिल्याने गावात जल्लोष करण्यात आला. ---------------------- 

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीSugar factoryसाखर कारखाने