Pranjal Khewalkar: राजकीय हेतूसाठी प्रांजल खेवलकर यांचा बळी दिला जातोय; वकिलांचा कोर्टात युक्तिवाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 19:32 IST2025-07-29T19:31:03+5:302025-07-29T19:32:17+5:30
पार्टीत कोकेन आणलेल्या ईशा सिंगला पार्टीच्या ठिकाणी पाठवून ट्रॅप रचण्यात आल्याचा दावा आरोपीच्या वकिलांनी केला आहे

Pranjal Khewalkar: राजकीय हेतूसाठी प्रांजल खेवलकर यांचा बळी दिला जातोय; वकिलांचा कोर्टात युक्तिवाद
पुणे : पुण्यातील खराडी रेव्ह पार्टी प्रकरणात रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांच्यासहीत ४ जणांना २ दिवसाची पोलीस कोठडी तर ईशा सिंग आणि प्राची शर्मा यांना या २ महिलांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. रेव्ह पार्टी प्रकरणानंतर दोन दिवसाची पोलीस कोठडी संपल्यावर या सातही आरोपींना आज कोर्टात हजर करण्यात आलं होत. प्रांजल खेवलकर, निखील पोपटाणी, समीर सय्यद, सचिन भोंबे, श्रीपाद यादव यांना २ दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तर ईशा सिंग आणि प्राची शर्मा यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
न्यायालयात आज दोन्ही बाजूकडून युक्तिवाद झाला. यावेळी तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की, सर्व आरोपींच्या घरी छापेमारी केली आहे. अनेक इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस हाती लागले आहेत. ब्लड आणि लघवीचे सँपल लॅब कडे पाठविले आहेत. त्याचे अहवाल यायचे आहेत. राहुल नावाचा एक नवा आरोपी निष्पन्न झाला आहे. जो हुक्का भरत होता त्याचा शोध सुरू आहे. हा आरोपी तीन दिवस त्याच ठिकाणी होता. पार्टी मध्ये अमली पदार्थ कुठून आणले अस विचारलं असता एकमेकाकडे हात करत आहेत. तपासात सहकार्य करत नाहीत. दोन महिलांना न्यायालयीन कोठडी द्यावी. तर इतर ५ जणांना पोलीस कोठडी द्यावी. सरकारी वकिलांनी राहुल ला ताब्यात घ्यायचं आहे. जास्तीत जास्त पोलीस कोठडी द्या असा युक्तिवाद कोर्टात केला. राहुल ला ताब्यात घ्यायचं आहे. जास्तीत जास्त पोलीस कोठडी द्या अशी मागणी सरकारी वकिलांनी केली होती.
मुद्दाम अडकवलं जात आहे
प्रांजलवर ट्रॅप करण्यात आला आहे. तपासात काहीच प्रोग्रेस नाहीये. हे चौकशी करत आहेत. रिमांड रिपोर्ट मध्ये सांगत आहेत की, सिझ करायचं आहे पण काय हे माहिती नाही. मुलींना त्या ठिकाणी पाठवून ट्रॅप रचण्यात आला. टेबलवर महिलांची बॅग होती. त्यात अमली पदार्थ सापडले आहेत. कोकेन असल्याचं सांगितले जात आहे, ही पावडर ईशा सिंग हिने आणली होती. तिला यांनीच पाठवलं होत. प्रांजल यांनी काहीच आणलं नाही. तर मला कुठल्या आधारे पोलीस कोठडी मागत आहेत. राजकीय रित्या अडविण्यासाठी हे सगळ केलं जात आहे. व्हिडीओ व्हायरल केले जात आहे. अमली पदार्थ महिलेच्या बॅगेतून निघाले तिला एमसीआर मागितला जात आहे. केवळ ते विरोधी पक्षात असल्याने हे सगळ केलं जात आहे. प्रांजल यांनी अमली पदार्थांचे सेवन केलं नाही. त्यांच्याकडे अमली पदार्थ सापडले नाहीत. पोलीस समोर होते, प्रांजल यांनी असलं काही केलं नाही. ईशा सिंग कडे गांजा सापडला आहे. केवळ राजकीय हेतूसाठी बळी दिला जात आहे. एक महिला राजकारणात आहे. म्हणून तिच्या नवऱ्याला अडकवल जात आहे. ईशा सिंग ही महिला प्रांजल यांना अडकवण्यासाठी प्लांट केली गेली होती. केवळ बदनामी करण्यासाठी हे केलं जात आहे. अटकेची कारणे अजून दाखवली नाहीत. जी पांढरी पावडर सापडली ती कोकेन आहे अस सांगितल जात आहे. पण ते चेक केलं नाही. केवळ ७ मिली ग्राम साठी हे सगळ नाटक उभं केलं गेलं आहे. मुद्दाम अडकवलं जात आहे. न्यायालयीन कोठडी द्यावी अशी मागणी आरोपीच्या वकिलांनी केली होती
प्रांजल यांना पोलीस कोठडी
कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर प्रांजल खेवलकर, निखील पोपटाणी, समीर सय्यद, सचिन भोंबे, श्रीपाद यादव यांना २ दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तर ईशा सिंग आणि प्राची शर्मा यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आली आहे.
हे सगळे बनावट आणि खोट - आरोपीचे वकील
आरोपींना न्यायलात हजर करण्यात आलं होतं. दोन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. ज्या मुलीकडे हे ड्रग्स सापडलं होतं त्याच्याकडे गांजा सापडला होता तिला सोडून देण्यात आल आहे. म्हणजे त्यांना न्यायालयीन कोठडी दिली आहे. आम्ही तपासाला सहकार्य करत आहोत. दोन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. एफआयआर आणि पंचनामं मध्ये सगळ आहे. महिलेकडे गांजा आणि कोकेन सापडलं आहे. त्याच महिलेला एमसीआर देण्यात आला आहे. प्रांजलने कुठलही ड्रग्स सेवन केलं नव्हतं. प्रांजलचे महिलेशी कुठल्याही प्रकारचे संबंध नाहीत. हे सगळं प्रकरण बनावट आहे. त्या महिलेने हे अमली पदार्थ आणले होते. सगळ ट्रॅप रचला होता. राहुल आला असेल किंवा आणखीन कोण आला असेल याच्याशी प्रांजलचा काय संबंध? अमली पदार्थ मिळून आले नाही. व्हिडिओ काढले त्या संदर्भात पत्र देऊन उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. कुटुंबाची बदनामी करण्यासाठी व्हिडिओ देण्यात आले. अहवाल का समोर येत नाही. व्हिडिओ शूटिंग मध्ये सगळ्या दिसत आहे की महिला पर्समधून अमली पदार्थ काढत आहे. हे सगळे बनावट आणि खोट आहे - विजयसिंह ठोंबरे (आरोपी वकील)