सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 18:38 IST2025-08-07T18:37:33+5:302025-08-07T18:38:44+5:30
या प्रकरणात 'अरुष' नावाचा व्यक्ती महिलांना पुरवत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. तो सिनेमात काम देण्याचे आमिष दाखवून मुलींचे शोषण करत होता.

सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
पुणे - खराडी येथील एका हॉटेलमध्ये रेव्ह पार्टी प्रकरणात पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर आता राज्य महिला आयोगाने या प्रकरणात सक्रीय भूमिका घेतली आहे. आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना पत्र पाठवून सखोल तपासाचे आदेश दिले होते, तर आज आयोगाने या प्रकरणात मानवी तस्करीचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
पत्रात नमूद केल्याप्रमाणे, प्रांजल खेवलकर या व्यक्तीने स्वतःच्या नावावर तब्बल २८ वेळा हॉटेलमध्ये रुम बुक करून विविध मुलींना बोलावल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. चाकणकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत या प्रकरणाचे धक्कादायक तपशील समोर आले आहेत.
रुपाली चाकणकर म्हणाल्या की, खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये हिडन फोल्डरमध्ये मोठ्या प्रमाणावर नग्न आणि अर्धनग्न फोटो, तसेच व्हिडिओ आढळले आहेत. एकूण १,७४९ नग्न फोटो व व्हिडिओ असून, त्यामध्ये २३४ फोटो आणि २९ व्हिडिओ अत्यंत अश्लील स्वरूपाचे आहेत. हे सर्व फोटो व व्हिडिओ पीडित महिलांना ब्लॅकमेल करण्यासाठी वापरण्यात आले असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. महिलांना सिनेमात काम देण्याचे आमिष दाखवून लोणावळा, साकीनाका परिसरात पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले. त्या ठिकाणी महिलांवर नशा देऊन लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा आरोप चाकणकर यांनी केला. काही महिलांशी आपत्तीजनक चॅटिंगही करण्यात आले आहे. पीडितांमध्ये मोलकरणींचाही समावेश आहे.
दरम्यान, या प्रकरणातील गंभीर स्वरूप लक्षात घेता, विशेष तपास पथक (SIT) ने तपास करावा व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राज्य महिला आयोगाने केली आहे. चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली आयोग याप्रकरणाकडे गांभीर्याने पाहत असून, महिलांच्या सुरक्षिततेसाठी कठोर पावले उचलली जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
अरुष नावाच्या व्यक्तीचा सहभाग
या प्रकरणात 'अरुष' नावाचा व्यक्ती महिलांना पुरवत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. तो सिनेमात काम देण्याचे आमिष दाखवून मुलींचे शोषण करत होता. मानवी तस्करी विरोधी पथकाने या प्रकरणात तपास सुरु केला असून, आरोपींनी केलेल्या आर्थिक व्यवहारांचा, मोबाईल आणि ईमेलचा तपास करण्याची गरज असल्याचे चाकणकर यांनी स्पष्ट केले.