Pranjal Khewalkar Arrest : मोबाईलमधून हाऊस पार्टीतील महिलांशी केलेली चॅटिंग व पार्टीचे व्हिडिओ सापडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 10:29 IST2025-07-30T10:27:54+5:302025-07-30T10:29:05+5:30

पोलिसांनी सीडीआर सुद्धा मिळवला आहे. त्यात राहुल नावाचा व्यक्ती निष्पन्न झाला आहे. त्याचा नेमका या पार्टी मधील काय सहभाग आहे, हे अजून तपासायचे आहे.

Pranjal Khewalkar Arrest: Chatting with women at house party and party videos found on mobile | Pranjal Khewalkar Arrest : मोबाईलमधून हाऊस पार्टीतील महिलांशी केलेली चॅटिंग व पार्टीचे व्हिडिओ सापडले

Pranjal Khewalkar Arrest : मोबाईलमधून हाऊस पार्टीतील महिलांशी केलेली चॅटिंग व पार्टीचे व्हिडिओ सापडले

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यावर पार्टीत ट्रॅप लावला आणि ताब्यात घेतले. पिशवीत २ ग्रॅमची, मग २.७० ग्रॅम कोकेन कुठून आलं? संबंधित महिलेला पार्टीला बोलावण्यात आलेले नव्हते. तरी ती कशी आली? असे अनेक प्रश्न खेवलकर यांच्या वकिलांनी न्यायालयात उपस्थित केले.

दरम्यान, पती खेवलकर यांच्या पत्नी रोहिणी खडसे या वकिलाचा कोट घालून न्यायालयात आल्या होत्या. पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणामध्ये एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्या अटकेने खळबळ उडाली. या प्रकरणात प्रांजल खेवलकर यांच्यासह ७ जणांना अटक केली. अटकेत असलेल्या सात आरोपींची पोलिस कोठडी मंगळवारी संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. खेवलकर यांचे वकील विजयसिंह ठोंबरे यांनी युक्तिवाद केला की मागील वेळेचा अगदी बरोबर तोच रिमांड रिपोर्ट दिला आहे. रिमांड रिपोर्टमध्ये काय जप्त करायचे आहे, याचा उल्लेख नाही.

अमली पदार्थ कोणाच्या बॅगमधून आले? तर ईशा सिंग यांच्या बॅगमधून आले. जे व्हिडिओ व्हायरल केले त्यात सुद्धा दिसत आहे की तिच्या बॅगमधून अमली पदार्थ आहेत. राजकीय व्यक्तीच्या जवळचा माणूस असल्यामुळे आम्हाला पोलिस कोठडी मिळावी असे म्हणत आहेत. पण प्रांजल खेवलकर यांना न्यायालयीन कोठडी मिळावी, अशी मागणी ठोंबरे यांनी केली. सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला की, "पहिल्या दिवसापासून पोलिस तपास करीत आहेत. पोलिसांनी सीडीआर सुद्धा मिळवला आहे. त्यात राहुल नावाचा व्यक्ती निष्पन्न झाला आहे. त्याचा नेमका या पार्टी मधील काय सहभाग आहे, हे अजून तपासायचे आहे. तर तपास अधिकारी यांनी न्यायालयात सांगितले की, आरोपीचे नमुने लॅबमध्ये पाठवले आहेत. राहुल नावाचा व्यक्ती निष्पन्न झाला आहे, तो हुक्का भरत होता. अमली पदार्थ कुठून आणले तर आरोपी एकमेकांचे नाव घेत आहेत.

एप्रिल व मे महिन्यातही झाली होती हाऊस पार्टी
 
खराडीतील हॉटेल स्टेबर्डमधील अमली पदार्थांच्या पार्टीपूर्वी एप्रिल व मे महिन्यात देखील हाऊस पार्टी झाल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या मोबाईलमधून अनेक महिलांशी चॅटिंग तसेच पार्टीचे फोटो व व्हिडिओ मिळाले आहे, अशी माहिती पुणे पोलिसांनी न्यायालयात दिली. 

Web Title: Pranjal Khewalkar Arrest: Chatting with women at house party and party videos found on mobile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.