Pranav Marathe चा जामीन अर्ज फेटाळला; Cosmos Bank चं थकवले साठ कोटींचं कर्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2021 21:37 IST2021-09-28T21:37:26+5:302021-09-28T21:37:38+5:30
तब्बल १८ गुंतवणूकदारांची ५ कोटी नऊ लाख ७२ हजार ९७० रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणात प्रणव मराठे यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.

Pranav Marathe चा जामीन अर्ज फेटाळला; Cosmos Bank चं थकवले साठ कोटींचं कर्ज
पुणे : ज्वेलर्सच्या विविध योजनांमध्ये रोख रक्कम, सोने,चांदी आदी गुंतवणूक करायला लावत चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून तब्बल १८ गुंतवणूकदारांची ५ कोटी नऊ लाख ७२ हजार ९७० रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणात प्रणव मराठे यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.
या गुन्ह्यात मराठे ज्वलर्स-प्रणव मराठे ज्वलर्स प्रा. लि. यांनी कॉसमॉस बँकेकडून स्टॉकच्या किमतीवर ६० कोटी रुपयांचे कर्ज घेऊन त्याची परतफेड न केल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल झाली आहे. आरोपींनी या बँकेकडून कर्ज घेऊन त्याची वेळेत परतफेड केलेली नाही. त्यामुळे बँकेचे त्यांना वसुलीची नोटीस पाठवली आहे. प्रणव मराठे हे मराठे
ज्वलर्स-प्रणव मराठे ज्वलर्स प्रा. लि. या दोन्ही भागीदारी संस्थाचे प्रत्येकी २० टक्के भागीदार आहेत, अशी माहिती सरकारी वकील मारुती वाडेकर यांनी न्यायालयास दिली.
या गुन्ह्यात पोलिसानी प्रणव मिलिंद मराठे (वय २६, रा. रूपाली अपार्टमेंट, एरंडवणे), कौस्तुभ अरविंद मराठे (वय ५४) आणि मंजिरी कौस्तुभ मराठे (वय ४८, दोघे रा. कर्वेनगर) यांना अटक केली आहे. तर मयत मिलिंद उर्फ बळवंत अरविंद मराठे, नीना मिलिंद मराठे यांच्यासह इतरांविरोधात कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यांच्याविरोधात शुभांगी विष्णू कुटे (वय ५९, रा. शिवतीर्थ नगर, पौड रोड, कोथरूड) यांनी फिर्याद दिली आहे. प्रणव मराठे ज्वेलर्सची लक्ष्मी रोड तसेच पौड रोड कोथरूड येथील शाखांमध्ये १४ जानेवारी २०१७ ते जानेवारी २०२१ या कालावधीत हा प्रकार घडला.